AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane School Reopen : ठाण्यातील शाळा आजपासून सुरु, ग्रामीण सह शहरी भागातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार

आजपासून ठाण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

Thane School Reopen : ठाण्यातील शाळा आजपासून सुरु, ग्रामीण सह शहरी भागातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार
School Reopen
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 10:13 AM
Share

ठाणे: जिल्ह्यातील (Thane School  Reopen) ग्रामीण भागातील 987 शाळा आणि शहरी भागातील शाळा देखील आजपासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील पाचवी पासूनचे पुढील इयत्तांचे वर्ग यापूर्वीचं सुरु करण्यात आले होते. आजपासून ठाण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं (Maharashtra Government) जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.

ग्रामीण सोबतच शहरी भागातील शाळा सुरु होणार

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेचं ठाणे शहरातही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत.

शाळा सुरु करताना या नियमांचं पालन करावं लागणार

  1. पालकांचं संमतीपत्र आवश्यक
  2. ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार
  3. एका बेंचवर एक विद्यार्थी
  4. शाळा 3 ते 4 तास सुरु
  5. गृहपाठावर भर
  6. सांघिक खेळ खेळण्यास मनाई
  7. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
  8. सॅनिटायझेशन, हात धुण्याची सोय आवश्यक

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 1 डिसेंबर रोजी शाळा सुरु करण्याचा आदेश 29 नोव्हेंबरला काढण्यात आला होता. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कल्याण डोंबिवलीतील शाळांबाबत दोन दिवसात निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. ठाण्याप्रमाणेचं तिथं देखील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईत शाळा सुरु

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

इतर बातम्या:

बार्टीच्या बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ दिवशी प्रवेश परीक्षा

Mumbai School Reopen: मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त

Thane School Reopen schools to reopen from today in rural and urban area check here for guidelines

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.