AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC NET 2021 : युजीसी नेट परीक्षा अर्जाची करेक्शन विंडो खुली, या तारखेपर्यंत करु शकता दुरुस्ती

अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2021 आहे. अंतिम तारखेनंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याचे एनटीएने कळवले आहे. (The correction window of UGC NET exam application is open, you can make corrections)

UGC NET 2021 : युजीसी नेट परीक्षा अर्जाची करेक्शन विंडो खुली, या तारखेपर्यंत करु शकता दुरुस्ती
यूजीसी विद्यापीठांना पदवी पडताळणी वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश
| Updated on: Mar 12, 2021 | 10:16 PM
Share

नवी दिल्ली : युजीसी नेट परीक्षेच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ‘करेक्शन विंडो’ खुली करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षा घेणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने ही विंडो खुली केली आहे. ज्या उमेदवारांनी 2 फेब्रुवारी ते 9 मार्च 2021 पर्यंत युजीसी नेट अर्ज भरला होता, ते त्यांच्या अर्जात सुधारणआ करु शकतात. अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारांना एनटीए युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2021 आहे. अंतिम तारखेनंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याचे एनटीएने कळवले आहे. (The correction window of UGC NET exam application is open, you can make corrections)

उमेदवारांनी लक्षात ठेवा या तारखा

अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची मुदत – 12 ते 16 मार्च 2021

युजीसी नेट परीक्षेची तारीख – मे महिन्यातील 2 ,3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारीख

दुरुस्ती सशुल्क असणार

उमेदवार अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच स्कॅन केलेल्या फोटोही एडिट करू शकणार आहेत. एनटीएने युजीसी नेट अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी दिली आहे. एनटीएने अलिकडेच परीक्षेच्या अर्ज नोंदणीची अंतिम तारीख वाढवली होती. यापूर्वी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 2 मार्च निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन एनटीएने अंतिम मुदत 9 मार्चपर्यंत वाढवली. त्याचबरोबर फी जमा करण्यासाठी उमेदवारांना 10 मार्चपर्यंत मुदत दिली होती. युजीसी नेट परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये अशी वर्षातून दोनदा घेतली जाते. परंतु गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. दुरुस्तीसाठी उमेदवारांना अतिरिक्त फी भरावी लागेल. अतिरिक्त शुल्क (लागू असल्यास) संबंधित उमेदवार क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएम वॉलेटद्वारे भरु शकतात.

अर्जात बदल कसे करावे?

– Ugcnet.nta.nic.in वर एनटीए युजीसीच्या अधिकृत साईटवर जा. – मुख्य पृष्ठावर उपलब्ध अॅप्लिकेशन करेक्शन विंडो लिंकवर क्लिक करा. – लॉगिन तपशील प्रविष्ट करा मग आपले अॅप्लिकेशन ओपन होईल. – अर्जात आवश्यक ते बदल करा. – सबमिटवर क्लिक करा, आपले बदल जतन होतील. – अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची हार्ड कॉपी ठेवा. (The correction window of UGC NET exam application is open, you can make corrections)

संबंधित बातम्या

एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून, 30 दिवसांच्या क्रॅश कोर्ससह होईल तयारी पक्की

एआयसीटीईचा मोठा निर्णय, अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिक आणि रासायनशास्त्र आवश्यक नाही

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली