CBSE Board Exam 2021: सीबीएसई परीक्षेची तयारी करताय, मग टॉपर्सचा सल्ला नक्की वाचा

सीबीएसई परीक्षा किंवा अन्य कोणतीही परीक्षा असो विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियमित वेळापत्रक बनवणं आवश्यक आहे. CBSE Board Examination Preparation

CBSE Board Exam 2021: सीबीएसई परीक्षेची तयारी करताय, मग टॉपर्सचा सल्ला नक्की वाचा
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 6:23 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE ) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं असून प्रात्याक्षिक परीक्षांना सुरुवात झालीय. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाचं संकट आणि अभ्यासक्रमातील कपात यामुळं विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांची तयारी करताना संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र, विद्यार्थ्यांनी योग्य नियोजनानं अभ्यास केल्यास चांगलं यश मिळू शकते, असं यापूर्वी परीक्षांमध्ये टॉप आलेल्या विद्यार्थ्यांचं मत आहे. टॉपर्सच्या सल्ल्याचा वापर करुन अभ्यास केल्यास विद्यार्थी यश मिळवू शकतात. (Toppers gave some tips to prepare CBSE Board Examination)

टॉपर्स सांगतात घाबरून जाऊन नका

कोणतीही परीक्षा आली की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तणाव निर्माण होतो. परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थी घाबरून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असं, आर्मी पब्लिक स्कूल,डेहराडूनचा टॉपर धर्मेश नेगी यानं परीक्षेसंबंधी भीती दूर करण्यासाठी योग्य दिनक्रम बनवण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, असंही तो म्हणाला.

वेळापत्रक बनवा

सीबीएसई परीक्षा किंवा अन्य कोणतीही परीक्षा असो विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियमित वेळापत्रक बनवणं आवश्यक आहे. नियोजनाशिवाय अभ्यास केल्यास यश मिळण्याची हमी नसते. त्यामुळे केंद्रीय विद्यालय, एर्नाकुलम येथील विद्यार्थी साईकृपा सेतुरमन सांगतो की, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं गरजेचे आहे. दररोजसाठी परीक्षेतील काही घटकांचा अभ्यास केला पाहिजे. साईकृपा सांगतो की परीक्षेची तयारी करताना काही प्रश्नांची वारंवार तयारी करणं गरजेचे असते.

स्मार्ट स्टडी

विद्यार्थी काहीवेळा खूप अभ्यास करतात मात्र त्यातुलनेत त्यांना विषय समजत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक नमुना प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचे आहे.कोलकाताच्या हेरिटेज स्कूलची विद्यार्थिनी अनन्या मैत्री हिनं दररोज गणित, अकाऊंट, इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयांचे जुने प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक असल्याचं सांगितले.

रट्टा न मारता विषय समजावून घ्या

नोएडामधील मेघना श्रीवास्तव सांगते की काही विद्यार्थ्यांना विषय समजावून न घेता रट्टा मारण्याची सवय असते. मात्र, विद्यार्थ्यांनी त्या मार्गाचा वापर करुन नये. विद्यार्थ्यांना यामुळे विषय समजत नाही. परीक्षेपूर्वी रट्टा मारलेल्या विषयातील गोष्टी विसरल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील मूलभूत ज्ञान समजून घ्यावं, असं मेघना श्रीवास्तव म्हणते.

पूर्ण झोप घ्या

एर्नाकुलम येथील विद्यार्थिनी श्रीलक्ष्मी हिनं विद्यार्थ्यांनी नेहमी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक, असल्याचं म्हटलं आहे. परीक्षा काळात आपल्या मेंदूला आराम देण्याची गरज असते. त्यामुळे अभ्यासासोबत झोप घेणं देखील तितकेच गरजेचे असते, असं श्रीलक्ष्मी सांगते. सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेत टॉपर आलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या टीप्सचा वापर करुन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश(Opens in a new browser tab)

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

(Toppers gave some tips to prepare CBSE Board Examination)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....