कोविड टास्क फोर्सद्वारे मदत कार्य सुरु करा, यूजीसीचे विद्यापीठांना आदेश

यूजीसीनं सर्वच विद्यापीठांना आणि उच्च शिक्षण संस्थांना कोविड टास्क फोर्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. UGC universities Covid Task Force

कोविड टास्क फोर्सद्वारे मदत कार्य सुरु करा, यूजीसीचे विद्यापीठांना आदेश
UCG

पुणे: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या लढ्यासाठी आता विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोविड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश, यूजीसीनं दिले आहेत. (UGC ordered to all universities in Maharashtra to setup Covid Task Force in Maharashtra)

कोविड टास्क फोर्स उभारा आणि मदत करा

यूजीसीनं सर्वच विद्यापीठांना आणि उच्च शिक्षण संस्थांना कोविड टास्क फोर्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. तात्काळ कोविड टास्क फोर्स उभारून मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राध्यापक, शिक्षक , विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा अशा सूचना आयोगानं दिल्या आहेत.

समाजातील विविध घटकांचं समुपदेश करा

यूजीसीनं कोविड टास्क फोर्सद्वारे शक्य होईल तितकी मदत करावी आणि समाजामधील विविध घटकांचं समुपदेशन करण्याचे आदेश यूजीसीनं दिले आहेत. युजीसीचे अध्यक्ष डॉ.डी पी सिंह यांनी विद्यापीठांना पत्रक पाठवलं आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठात कोविड हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

भारतात 3 लाख 48 हजार नवे कोरोना रुग्ण

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 19 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 48 हजार 421 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 205 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला होता

संबंधित बातम्या:

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; आजच अर्ज करा आणि मिळवा नोकरी

मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश

(UGC ordered to all universities in Maharashtra to setup Covid Task Force in Maharashtra)