Maharashtra SSC Result 2021 | ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Akshay Adhav

Updated on: Jul 16, 2021 | 1:04 PM

Maharashtra SSC Result : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही... त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं.... मात्र तरीही काही शेकडो विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत.

Maharashtra SSC Result 2021 |  ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?
फाईल फोटो

Maharashtra SSC Result 2021 : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही… त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं…. मात्र तरीही काही विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत तर राज्यातल्या एकूण 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. परंतु निकाल जाहीर करताना आणि प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये देखील एक्झॅट अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा किती, याचा आकडा दिलेला नाही.

यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखी तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यामध्ये काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल राखीव कसासाठी, नेमकं कारण काय?

4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यात सर्वाधिक विद्यार्थी रिपीटर्स आहेत, ज्यांचे मागील 3,4 वर्षांच्या गुणपत्रिका तपासणे आवश्यक आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यांच्या आधीच्या निकालाच्या प्रती पडताळण्याचे काम सुरु असून, यानंतर या विद्यार्थांचे निकाल जाहीर होतील.

957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के, 9 शाळांचा निकाल शून्य टक्के

दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.

(What is the number of students who failed maharashtra SSC Result)

हे ही वाचा :

Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI