Ahmednagar Lok Sabha Results : अहमदनगर लोकसभा निकाल 2019

Ahmednagar Lok Sabha Results : अहमदनगर लोकसभा निकाल 2019

अहमदनगर जिल्ह्यात नगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन मतदारसंघ येतात. यातील नगर दक्षिण मतदारसंघाची चर्चा अवघ्या देशात झाली. याचे कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनाच भाजपने पक्षात घेऊन तिकीट दिलं. त्यामुळेन नगर दक्षिणची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.

दक्षिण नगर लोकसभा निकाल – South Ahmednagar Lok Sabha Results : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महत्वाच्या मतदारसंघापैकी एक अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप अशी लढत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं या मतदारसंघात विशेष लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुजय विखे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंग्राम जगताप (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरसुधाकर आव्हाड (VBA)पराभूत

शिर्डी लोकसभा निकाल – Shridi Lok Sabha Results : शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा म्हणजेच 0.77 टक्क्यांनी वाढला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून संजय सुखदान, भाकपकडून बन्सी सातपुते तसेच अपक्ष आणि भाजपचे बंडखोर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यात पचरंगी लढत होईल असं चित्र सुरूवातीला दिसून आलं. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार हे स्पष्ट झालं.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासदाशिव लोखंडे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीभाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरसंजय सुखदान (वंचित)पराभूत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI