Aurangabad Lok Sabha Results : औरंगाबाद लोकसभा निकाल 2019

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:25 AM, 17 May 2019
Aurangabad Lok Sabha Results : औरंगाबाद लोकसभा निकाल 2019

गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेची एक हाती सत्ता असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी होती. बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत रंगतदारपणा निर्माण झाला. औरंगाबाद लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला  63.40 टक्के मतदान झालं. 2014 च्या तुलनेत 2 टक्के मतदान वाढलं. 2014 मध्ये इथे 61.85 टक्के मतदान झालं होतं.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरइम्तियाज जलील (VBA)विजयी
भाजप/शिवसेनाचंद्रकांत खैरे (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुभाष झांबड (काँग्रेस)पराभूत