Jalgaon Lok Sabha Results : जळगाव लोकसभा निकाल 2019

Jalgaon Lok Sabha Results : जळगाव लोकसभा निकाल 2019

जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात येतात.

जळगाव लोकसभा निकाल – Jalgaon Lok Sabha Results : जळगाव लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं.  जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उन्मेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली. जळगावातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या मतदारसंघांसाठी 23 एप्रिललाच मतदान झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात 56.11 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघांत मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला. 2014 मध्ये जळगाव मतदारसंघात 58 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

पक्ष उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना उन्मेष पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादी गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)पराभूत

रावेर लोकसभा निकाल – Raver Lok Sabha Results : रावेर लोकसभा मतदारसंघात 23 मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघात भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसकडून उल्हास पाटील अशी लढत झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात 61.40 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला. सन 2014 मध्ये रावेर मतदारसंघात 63.48 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या घसरलेल्या मतदानटक्क्याचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला नुकसान होणार याची उत्सुकता मतदानापासून लागून होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारक्षा खडसे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीउल्हास पाटील (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरनितीन कांडेलकर (VBA)पराभूत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI