Raigad Lok Sabha Results : रायगड लोकसभा निकाल 2019

रायगड जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगड लोकसभा मतदारसंघ आणि पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात. रायगड लोकसभा मतदारसंघ – Raigad Lok Sabha Constituency : रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात लढत झाली. 2014 साली मोदीलाट असूनही सुनील तटकरे यांनी अनंत गीते …

Raigad Lok Sabha Results : रायगड लोकसभा निकाल 2019

रायगड जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगड लोकसभा मतदारसंघ आणि पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात.

रायगड लोकसभा मतदारसंघ – Raigad Lok Sabha Constituency : रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात लढत झाली. 2014 साली मोदीलाट असूनही सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी जेरीस आणलं होतं. शिवाय, तटकरेंनी निसटता पराभव स्वीकारला होता. यंदा पुन्हा गीते विरुद्ध तटकरे लढत झाल्याने निवडणुकीला रंगत आली. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाडमध्ये सभा घेतल्याने निकालाची उत्सुकता आणखी वाढली होती.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत रायगड लोकसभा निवडणुकीत पावणेतीन टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली. रायगड मतदारसंघातील 16 लाख 51 हजार 557 पैकी 10 लाख 20 हजार 185  मतदारांनी मतदान केले.

रायगड लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाअनंत गीते (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुनिल तटकरे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरसुमन कोळी (VBA)पराभूत

मावळ लोकसभा मतदारसंघ – Maval Lok Sabha Constituency : मावळमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तर वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील यांच्यात तिहेरी लढत झाली.

मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. 

मावळ लोकसभा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाश्रीरंग बारणे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीपार्थ पवार (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरराजाराम पाटील (VBA)पराभूत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *