Yavatmal Lok Sabha Results : यवतमाळ लोकसभा निकाल 2019
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.09 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2.29 टक्क्यांनी वाढला. या मतदारसंघात शिवसेनेकडून भावना गवळी, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये काँग्रेसचे शिवाजी मोघे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी बाजी […]

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.09 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2.29 टक्क्यांनी वाढला. या मतदारसंघात शिवसेनेकडून भावना गवळी, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये काँग्रेसचे शिवाजी मोघे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी बाजी मारली होती. मात्र 2019 च्या लढतीत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | भावना गवळी (शिवसेना) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | माणिकराव ठाकरे (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | प्रो. प्रवीण पवार (VBA) | पराभूत |
