AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे युतीमध्ये लढलो तिथे… एकनाथ शिंदेंचे महापौर पदाबाबत खळबळजनक वक्तव्य! नव्या चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता ते नेमकं काय म्हणाले वाचा...

जिथे युतीमध्ये लढलो तिथे... एकनाथ शिंदेंचे महापौर पदाबाबत खळबळजनक वक्तव्य! नव्या चर्चांना उधाण
devendra fadnavis and eknath shindeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 19, 2026 | 4:44 PM
Share

कित्येक वर्षांनंतर रखडलेला महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 15 जानेवारी रोजी जवळपास राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी मुंबईत शिवसेना आणि भाजप महायुती करत एकत्र निवडणूक लढले. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण आता जेव्हा महापौर पद कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहेत.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबित महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले.

यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष, शिवसेना ठाकरे गट नंबर दोनचा पक्ष, शिवसेना शिंदे गट नंबर तीनचा पक्ष ठरले आहेत. त्यानंतर भाजपाचाच महापौर मुंबई महापालिकेवर होणार असल्याचे सांगितले गेले. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले असताना देखील असे म्हटले जात होते. आता एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा महापौर होणार असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल