विदेशी गायींचं दूध प्यायल्याने स्त्रियांची फिगर बेढब होतेय; डीएमकेचा नेता बरळला

डिंडीगुल लियोनी असं या डीएमकेच्या उमदेवाराचं नाव आहे. (DMK candidate says women no longer have figure 8 as they drink milk of foreign cows)

विदेशी गायींचं दूध प्यायल्याने स्त्रियांची फिगर बेढब होतेय; डीएमकेचा नेता बरळला
dindigul leoni
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 7:34 PM

चेन्नई: पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना साडी नव्हे, बरमुडा नेसा, असा धक्कादायक सल्ला दिल्याची घटना ताजी असतानाच आता तामिळनाडूतील डीएमकेचा एक उमेदवार बरळला आहे. त्याने थेट महिलांवरच आक्षेपाहार्य टिप्पणी केली आहे. विदेशी गायींचं दूध प्यायल्याने महिलांची फिगर बेढब होत आहे, असं संतापजनक विधान या उमेदवाराने केलं असून त्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (DMK candidate says women no longer have figure 8 as they drink milk of foreign cows)

डिंडीगुल लियोनी असं या डीएमकेच्या उमदेवाराचं नाव आहे. तो पक्षासाठी तामिळनाडूच्या विविध भागात प्रचार करत आहे. एका प्रचारसभेत तर त्याने थेट महिलांची तुलना गायीशी केली आहे. विदेशी गायींचं दूध प्यायल्याने महिलांची फिगर बिघडत आहे. एका गोशाळेत विदेशी गायींनी दूध द्यावं म्हणून मशीनचा वापर करण्यात येत आहे. हल्ली स्त्रिया विदेशी गायींचं दूध पीत आहेत. त्यामुळे त्यांचं वजन वाढलं आहे, असं डिंडीगुल याने म्हटलं आहे. त्याच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संतापही व्यक्त केला जात आहे.

घोष यांचाही व्हिडीओ व्हायरल

डिंडीगुल लियोनी यांनी ज्या दिवशी हे आक्षेपहार्य विधाने केली त्याच दिवशी भाजप नेते दिलीप घोष यांनीही एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या साडीवर टिप्पणी केली आहे. प्लास्टर कापलेलं आहे. क्रॅप बँडेज बांधलेलं आणि पायवर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेलं कधीच कुणाला पाहिलेलं नाही. पायच उघडे ठेवायचे असतील तर साडी तरी का नेसली? बरमुडा का नाही परिधान केला? असं धक्कादायक वक्तव्य दिलीप घोष यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजपच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा गायत्री रघुराम यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी लियोनी यांचं विधान धक्कादायक आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. सध्या पाचही राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात आरोपप्रत्यारोप होत असताना नेत्यांकडून धक्कादायक विधाने केली जात आहेत. खासकरून महिलांना टार्गेट करणारीच विधाने केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (DMK candidate says women no longer have figure 8 as they drink milk of foreign cows)

संबंधित बातम्या:

साडी नव्हे, बरमुडा नेसा, ममता बॅनर्जींवर टीका करताना ‘या’ भाजप नेत्याची जीभ घसरली

West Bengal Assam Opinion Poll LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं बहुमताजवळ,आसाममध्ये भाजप पुन्हा

est Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

(DMK candidate says women no longer have figure 8 as they drink milk of foreign cows)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.