Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?

Goa Election Result 2022 | मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस (सकाळी 10.30 वाजता) शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे.

Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? 'नोटा'पेक्षाही कमी मतं?
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं?
Image Credit source: टीव्ही9
अनिश बेंद्रे

|

Mar 10, 2022 | 10:56 AM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या निकालाची (Goa Elections result 2022) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर सुरु (BJP vs Congress) आहे. सर्वांचं लक्ष लागलेले उत्पल मनोहर पर्रिकर (Utpal Parrikar) पणजी मतदारसंघातून अपक्ष रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांची पिछेहाट होताना दिसत आहे. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही आघाडी-पिछाडी सुरु आहे. महाराष्ट्राचा सख्खा शेजारी असलेल्या गोव्यात फक्त भाजप-काँग्रेसच नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गोव्यात 12 जागांवर लढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीचे सदस्य असलेले सेना-राष्ट्रवादी गोव्यात काय करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस (सकाळी 10.30 वाजता) शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भाजपला सर्वाधिक मतवाटा असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. अजूनही मतमोजणी सुरु असून मतांचा वाटा पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

आप {6.78%}
तृणमूल काँग्रेस {4.89%}
भाजप {33.60%}
गोवा फॉरवर्ड पक्ष {1.14%}
काँग्रेस {23.54%}
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष {8.60%}
राष्ट्रवादी {1.06%}
नोटा {1.17%}
शिवसेना {0.25%}
इतर {18.98%}


संबंधित बातम्या :

पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे

मुख्यमंत्र्यांवर पराभवाची टांगती तलवार; सावंत, धामी, बीरेन यांचे काय होणार?

पंजाबमध्ये ‘आप’ का झाडू चल गया’, चन्नी, सिद्धू, अमरिंदर, बादल पिछाडीवर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें