Punjab Vidhan Sabha Election 2022 LIVE: पंजाबमध्ये ‘आप’ का झाडू चल गया’, चन्नी, सिद्धू, अमरिंदर, बादल पिछाडीवर

Punjab Vidhan Sabha Election 2022 LIVE एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपचीच सत्ता येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आपला बंपर जागा मिळाल्या आहेत. पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये आपला 56 जागांवर आघाडी मिळाली आहे.

Punjab Vidhan Sabha Election 2022 LIVE: पंजाबमध्ये 'आप' का झाडू चल गया', चन्नी, सिद्धू, अमरिंदर, बादल पिछाडीवर
पंजाबमध्ये 'आप' का झाडू चल गया', चन्नी, सिद्धू, अमरिंदर, बादल पिछाडीवर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:36 PM

चंदीगड: एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये (punjab) आपचीच (aap) सत्ता येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आपला बंपर जागा मिळाल्या आहेत. पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये आपला 56 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसला 39, अकाली दल आघाडीला 14 आणि भाजप (bjp) आघाडीला केवळ सात जागांवर आघाडी मिळाली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल आदी दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. पंजाबमधील मतदारांनी जुन्या आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिल्याचं चित्रं आहे. मात्र, हा सुरुवातीचा कल असून संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचं चित्रं अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पंजाबच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

अमरिंदर सिंग 5 हजार मतांनी पिछाडीवर

  1. माजी मुख्यमंत्री आणि लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भाजपशी युती होती. मात्र, या युतीला फारसं यश मिळताना दिसत नाही. अमरिंदर सिंग पटियाला अर्बनमधून उभे होते. या ठिकाणी ते पाच हजार मतांनी पिछाडीवर आहेत. आपचे उमेदवार हरजोत बैंस यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर आघाडी घेतली आहे.

चन्नी 2200 मतांनी पिछाडीवर

  1. बरनाला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात आपने आघाडी घेतली आहे. बरनालामध्ये आपचे उमेदवार गुरमीत सिंग हे 2100 मतांनी आघाडीवर आहेत. महल कलांमधून आपचे उमेदवार कुलवंत सिंग पंडोरी सुमारे 1700 मतांनी आघाडीवर आहेत. तर सर्वात हॉट सीट मानल्या जाणाऱ्या भदोड येथे मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी या मतदारसंघातून लढत आहेत. या ठिकाणीही आपचे उमेदवार लाभ सिंग आघाडीवर आहेत. त्यांनी चन्नींवर 2200 मतांनी आघाडी घेतली आहे. दलित बहुल मतदारसंघातच राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री पिछाडीवर असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सिद्धूही पिछाडीवर

  1. अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातही आपचा जलवा पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम सिंग मजीठिया हेही पिछाडीवर आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आपचे उमेदवार जीवन ज्योत यांना 1500 मते मिळाली आहेत. तर विक्रम सिंग मजीठिया यांना 1067 मते मिळाली असून नवज्योत सिंग सिद्धू यांना 949 मते मिळाली आहेत.

बादलही पिछाडीवर

  1. लंबी विधानसभा मतदारसंघातून लढत असलेले माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चिरंजीव सुखबीर सिंग बादल पिछाडीवर आहेत. या ठिकाणी आपचे उमेदवार गुरमीत सिंग आघाडीवर आहेत.

संबंधित बातम्या:

UP Election Result 2022 Live : ECI नुसार भाजप 152 जागांवर आघाडीवर, सपा 66 जागांवर पुढे

Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.