AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानासाठी जाताय? घरबसल्या मिळवा मतदार ओळखपत्र…मतदान केंद्रापासून, क्रमांकापर्यंत सर्व A to Z माहिती

voter id card check online: मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा इतर 12 प्रकारापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला न्यावे लागणार आहे. ते दाखवल्यावर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करु देतील.

मतदानासाठी जाताय? घरबसल्या मिळवा मतदार ओळखपत्र...मतदान केंद्रापासून, क्रमांकापर्यंत सर्व A to Z माहिती
Lok Sabha Elections 2024
Updated on: May 13, 2024 | 9:53 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदानास जाण्यापूर्वी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. आपले मतदान केंद्र शोधणे आणि ओळखपत्र सोबत नेणे. या सर्व गोष्टी घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबद्दल सर्व माहिती उपलब्ध आहेत. तसेच ओळखपत्र म्हणून काय आवश्यक आहे, त्याची माहिती दिली आहे.

मतदान केंद्र कसे शोधावे

निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल. या ठिकाणी तुम्ही आवश्यत ती माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचे मतदान केंद्र मिळणार आहे. मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा इतर 12 प्रकारापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला न्यावे लागणार आहे. ते दाखवल्यावर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करु देतील.

असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा लागेल.

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://voters.eci.gov.in/ भेट द्या.आता होम पेजवर E-Epic Download पर्यायावर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला मोबाईल नंबर/ईमेल किंवा EPIC क्रमांक यासारखी काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर
  • पासवर्ड आणि कॅप्ससह विनंती OTP वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो टाकल्यानंतर, Verify वर क्लिक करा.
  • यानंतर, डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड e-EPIC पर्यायावर क्लिक करा.
  • आता डिजिटल व्होटर आयडी तुमच्याकडे पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड केला जाईल. तुम्ही त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.

मतदानासाठी आवश्यक पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणारे ओळखपत्र

  1. मतदान कार्ड
  2. पासपोर्ट (पारपत्र)
  3. वाहन चालक परवाना – Driving Licence
  4. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)
  5. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
  6. पॅनकार्ड (PAN card)
  7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
  8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  9. मनरेगा जॉबकार्ड
  10. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  11. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  12. आधारकार्ड (Aadhar)
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्....