AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnataka Election Results 2023 : कुणीच किंगमेकर नाही, काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार; आकडे काय सांगतात?

कर्नाटकात काँग्रेसच किंग ठरली आहे. काँग्रेसला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणीही किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार नाही. काँग्रेसने प्रचंड यश मिळवल्याने राज्यात तोडफोडीच्या राजकारणालाही वाव राहिलेला नाही.

Karnataka Election Results 2023 : कुणीच किंगमेकर नाही, काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार; आकडे काय सांगतात?
congress Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2023 | 12:01 PM
Share

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 70 जागा मिळताना दिसत आहेत. जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळताना दिसत आहे. राज्यात बहुमतासाठी 113 संख्याबळ आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळताना दिसत असल्याने राज्यात कोणताही पक्ष किंगमेकरची भूमिका निभावणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार जेडीएस राज्यात किंगमेकरची भूमिका निभावेल असं वाटत होतं. जेडीएसच्याच हाती सत्तेच्या चाव्या असतील असंही चित्र होतं. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान करत काँग्रेसला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे राज्यात जेडीएसच्या हातात सत्तेच्या चाव्या राहणार नसल्याचं दिसत आहे. उलट यावेळी जेडीएसच्या जागा घटताना दिसत आहेत. त्यामुळे जेडीएसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढं बहुमत मिळालं असलं तरी काँग्रेस जेडीएसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या हालचालींना दुपारनंतर वेग येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

भाजपच्या जागा प्रचंड घटल्या

2018च्या निवडणुकीत 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी भाजपला केवळ 68 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे भाजपला जवळपास 30 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. काँग्रेसला गेल्यावेळी 80 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 127 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसला 47 जागा अधिक मिळताना दिसत आहे. तर जेडीएसला मागच्यावेळी 37 जागा मिळाल्या होत्या. यावेळी जेडीएसला फक्त 22 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजेच जेडीएसला 15 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

काँग्रेस अलर्ट

कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलटर् झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी ऑपरेशन हस्था सुरू केलं आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी हे ऑपरेशन हस्था आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेश नुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक होणार आहे. त्यावेळी हे सर्व आमदार हजर राहणार आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?