Karnataka Election Result 2023 : कर्नाटक कुणाचे ? गुलाल कुणाचा? आज फैसला; निकालाचं काऊंटडाऊन सुरू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. सकाळी 8 वाजता कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. दुपारी 12 पर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक कुणाचे ? गुलाल कुणाचा? आज फैसला; निकालाचं काऊंटडाऊन सुरू
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 7:35 AM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) आज निकाल लागणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील. साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचे कल हाती येतील. त्यामुळे कर्नाटक कुणाच्या हाती जाणार? गुलाल कोण उधळणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान झालं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत 2,615 उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 5.31 कोटी मतदारांनी केला असून तो ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. राज्यात 73.19 टक्के मतदान झालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे. दक्षिणेकडील राज्यात कर्नाटक हाच एकमेव भाजपचा गड आहे. तोही हातचा गेल्यास भाजपच्या दक्षिणेतील अडचणी वाढणार आहेत.

बहुमत कितीला?

राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे. गेल्यावेळी 2018मध्ये भाजपला सर्वादिक 104 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. मायावतीच्या बीएसपी आणि केपीजेपीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. कर्नाटकात सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाले होते. काँग्रेसला 38.04 टक्के, भाजपला 36.22 टक्के आणि जेडीएसला 18.36 टक्के मते मिळाली होती.

बुस्ट कुणाला मिळणार?

लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी कर्नाटकात निवडणुका होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात कुणाला बुस्ट मिळणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सत्ता मिळताना दिसत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस निर्माण होताना दिसत आहे. मात्र, असं असलं तरी कर्नाटकचं खरं चित्रं काय आहे? कानडी जनतेच्या मनात काय आहे? याचं चित्रं थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

जेडीएस किंगमेकर बनणार?

भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटकात चुरशीची लढत होणार असली तरी जेडीएस या निवडणुकीत किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएसच्या हाती सत्तेची चावी असेल. कुणाला सत्तेत बसवायचे हे जेडीएस ठरवणार असल्याचं चित्रं आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीतही जेडीएस किंग मेकर ठरली होती. त्यावेळी काँग्रेसने जेडीएसकडे कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं.

निकाल कधी?

दिवस : शनिवार 13 मे 2023

वेळ : सकाळी 8 वाजल्यापासून

निकाल कुठे पाहाल?

TV9 मराठी : https://www.tv9marathi.com/live-tv?

TV9 हिंदी : www.tv9hindi.com/live-tv

News9live: www.news9live.com/digital-live-tv

यूट्यूब

TV9 मराठी : www.youtube.com/@TV9MarathiLive

TV9 हिंदी: www.youtube.com/@TV9Bharatvarsh

News9live: www.youtube.com/@NEWS9LIVE

वेबसाइट

TV9 मराठी : www.tv9marathi.com

TV9 हिंदी: www.tv9hindi.com

News9live: www.news9live.com

Non Stop LIVE Update
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.