Karnatak Election Survey: कर्नाटकात सत्ता परिवर्तन होणार? TV9 च्या सर्व्हेमध्ये पाहा कोणाला किती जागा?

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधी टीव्ही९ ने केलेल्या सर्व्हेमध्ये जनतेचा मूड काय आहे. हे जाणून घेऊया.

Karnatak Election Survey: कर्नाटकात सत्ता परिवर्तन होणार? TV9 च्या सर्व्हेमध्ये पाहा कोणाला किती जागा?
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 9:49 PM

Karnatak Election TV9 Survey : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ टक्कर असणार आहे. टीव्ही 9 आणि सी व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपच्या चिंता वाढताना दिसत आहेत. कारण कर्नाटकात जनतेचा कौल बदलताना दिसत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसत असून काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. कर्नाटकात कोणाचं सरकार बनतंय, भाजप-काँग्रेसच्या दाव्यांमध्ये किती ताकद आहे. पाहुया लोकांचा मूड काय आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान

कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी आपापल्या परीने दावा करत आहे. भाजपचा दावा आहे की ते पुन्हा सरकार स्थापन करणार, तर काँग्रेसने 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला आहे. पण मतदारांच्या मनात काय आहे हे टीव्ही 9 ने सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे.

जुन्या म्हैसूरमधील 55 जागांपैकी भाजपला 4 ते 8, तर काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळू शकतात. कित्तूर कर्नाटकातील 50 जागांपैकी भाजपला 21 ते 25 आणि काँग्रेसला 25 ते 29 जागा मिळू शकतात. जेडीएसला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. तटीय कर्नाटकमधील 21 जागांपैकी भाजपला 16 ते 20 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. कलाना कर्नाटकातील 31 जागांपैकी भाजपला 11 ते 15 जागा, काँग्रेसला 16 ते 20 जागा मिळू शकतात. जेडीएसला 1 जागा मिळू शकते. मध्य कर्नाटकातील 35 जागांपैकी भाजपला 13 ते 17, काँग्रेसला 18 ते 22 आणि जेडीएसला 1 जागा मिळू शकते. बंगळुरूमधील 32 जागांपैकी भाजपला 7 ते 11, काँग्रेसला 18 ते 22 आणि जेडीएसला 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणानुसार भाजपला 79 ते 89 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 106 ते 116 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 24 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात कोणाला किती जागा ?

बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 224 पैकी 113 जागांची आवश्यकता असेल. या सर्वेक्षणानुसार काँग्रेस खूपच मजबूत स्थितीत दिसत आहे, असे म्हणता येईल. ते बहुमताच्या जवळ येऊ शकतात. पण काँग्रेस १५० जागांवर जावा करत आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 40% मते मिळतील, तर भाजपला 33.9% मते मिळतील. जेडीएसला 18.8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये काँग्रेसची मते 38 टक्के होती, ती यावेळी वाढू शकतात. दुसरीकडे, भाजपची मतांची टक्केवारी 36 टक्क्यांवरून 33.9 टक्क्यांवर येऊ शकते. 2018 मध्ये भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या होत्या.

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करू इच्छिता? दुहेरी इंजिन सरकार राज्यासाठी फायदेशीर ठरले आहे का, हेही जनतेतून जाणून घेण्यात आले. याच्या उत्तरात 38.7% लोकांनी होय असे उत्तर दिले, तर 40.6% लोकांनी नाही असे उत्तर दिले. 20.7% म्हणाले की ते काहीही सांगता येणार नाही असे म्हटले.

Karnataka Survey

भाजपने ज्या पद्धतीने सरकार चालवले आहे ते कसे पाहता? सर्वेक्षणात विचारण्यात आले की, काँग्रेसने अनेक मोफत योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे त्यांची मते वाढण्याची शक्यता आहे का? 41.4% लोकांनी होय उत्तर दिले, तर 38.1% ने नाही असे उत्तर दिले.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.