प्रचंड विजय… प्रचंड टेन्शन ! माझं वय झालं, आधी मला दोन… सिद्धारमैया यांचा फॉर्म्युला; डीके शिवकुमार काय म्हणाले?

काँग्रेसने कर्नाटक जिंकले असले तरी आता काँग्रेसला नवंच टेन्शन सतावत आहेत. काँग्रेसमध्ये दोन दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने कुणाकडे सत्तेची सूत्रे द्यावीत या टेन्शनने काँग्रेस नेत्यांना घेरलं आहे.

प्रचंड विजय... प्रचंड टेन्शन ! माझं वय झालं, आधी मला दोन... सिद्धारमैया यांचा फॉर्म्युला; डीके शिवकुमार काय म्हणाले?
Karnataka CM RaceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 11:34 AM

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने प्रचंड यश मिळवलं आहे. पण या प्रचंड यशाबरोबर काँग्रेसमध्ये प्रचंड टेन्शनही निर्माण झालं आहे. मुख्यमंत्रीपद हे त्याला कारण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धारमैया हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोघांनीही मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून कंबर कसली आहे. सिद्धारमैया यांनी तर मुख्यमंत्रीपदावर थेट दावा केला आहे. मला आधी दोन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्या. त्यानंतर डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या, असा प्रस्तावच सिद्धारमैया यांनी काँग्रेस नेत्यांपुढे ठेवला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्यावर काँग्रेस कसा मार्ग काढते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस नेते सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी पार्टीसमोर एक फॉर्म्युला ठेवला आहे. आधी दोन वर्ष मला मुख्यमंत्रीपद द्या. त्यानंतर तीन वर्ष डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या, असं सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे. माझं वय झालं आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पहिल्या टप्प्यात सरकार चालवावं अशी माझी इच्छा आहे, असं सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी राजस्थान आणि छत्तीसगडची उदाहरणे देऊन हा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे.

हे सुद्धा वाचा

डीकेच प्रबळ दावेदार

सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांनी आमदारांकडे पाठबळ मागितलं आहे. जर डीकेंना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडल्यास सिद्धारमैयांची समजूत कशी घालायची? त्यांना कोणती जबाबदारी द्यायची? असा प्रश्न काँग्रेस हायकमांडला पडला आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून डीकेंनी पक्षासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या आहेत. पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही तर पक्षात चुकीचा मेसेज जाऊ शकतो. आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं तर सिद्धारमैया नाराज होतील. त्यामुळे अडकित्यात सुपारी अडकावी तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.

दिल्लीला बोलावलं

आज काँग्रेस आमदारांमध्ये मतदान होणार आहे. नेता निवडीसाठी हे मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर हे बॅलेट बॉक्स काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर ठेवले जाणार आहेत. त्यांच्यासमोरच ही मतांची गणती होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलावलं आहे. मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस ब उद्या मंगळवार किंवा बुधवारपर्यंत निर्णय घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. त्यांच्यासोबत 30 कॅबिनेट मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

Non Stop LIVE Update
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.