कर्नाटकचा सर्व्हे, काँग्रेस In?, भाजप Out? | पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

कर्नाटकात धुवांधार प्रचार सुरु झालाय. पण सर्व्हेनुसार भाजपला जबर धक्का बसताना दिसतोय आणि काँग्रेस मुसंडी मारताना दिसतेय. त्यातच महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी गेल्यानं ठाकरे गटानं घेरलंय.

कर्नाटकचा सर्व्हे, काँग्रेस In?, भाजप Out? | पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Karnataka ElectionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:54 PM

विजापूर (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारानं जोर धरलाय. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कर्नाटकच्या प्रचारात उतरले आहेत. मात्र यावेळी कर्नाटकात भाजपला झटका बसण्याची चिन्हं आहेत. Tv9 कन्नड आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार भाजपची बोम्मईंची सत्ता कर्नाटकातून जातेय. काँग्रेसला 111 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वेनुसार काँग्रेस बहुमतापासून 2 जागा दूर आहे. विशेष म्हणजे 2018 च्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या 31 जागा वाढतायत.

भाजपला सर्वेनुसार 84 जागा मिळतील, असं भाकीत आहे. म्हणजे कर्नाटकातलं भाजपचं सरकार जाणार. 2018च्या निवडणुकीपेक्षा भाजपला 20 जागांचा फटका बसताना दिसतोय. जेडीएसला 29 जागांचा अंदाज आहे. पण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 8 आमदार कमी होत आहेत. तर इतरांना 0 जागांचा अंदाज आहे.

कर्नाटकात तिरंगी लढत

कर्नाटकात भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी तिरंगी लढत आहे. 2018मध्ये काँग्रेसच्या पाठींब्यावर कुमारस्वामींचं सरकार होतं. मात्र ऑपरेशन कमळमुळं भाजपचं सरकार आलं. आता निवडणुकीत कर्नाटकची जनता काँग्रेसच्या बाजूनं उभी राहताना सर्व्हेतून दिसतेय आणि यावेळी 2 टक्के मतं गेम फिरवताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

2018च्या निवडणुकीत काँग्रेसला 38 टक्के मतं मिळाली होती. पण यावेळी काँग्रेसला 40 टक्के मतांचा अंदाज आहे, म्हणजेच 2 टक्के जास्त. भाजपला गेल्या निवडणुकीत 36 टक्के मतं होती. तरीही ती मतं काँग्रेसपेक्षा अधिक जागा निवडून आणण्यात परावर्तीत झाली होती. मात्र यावेळी 2.2 टक्के मतं कमी होतील, असा अंदाज आहे. म्हणजेच भाजप 33.9 टक्के मतं घेईल असं सर्व्हेतून दिसतंय.

महाराष्ट्रातूनही कर्नाटकात भाजपचे नेते प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सभा घेण्यास सुरुवात केलीय. फडणवीस कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी उतरल्यानं खासदार संजय राऊत यांनी सीमा भागावरुन घेरलंय. शिंदे आणि फडणवीसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरावं असं राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात निवडणुकांना अजून वेळ आहे. पण कर्नाटकातील निवडणुकीवरुन विशेषत: सीमा भागातल्या प्रचारातून शिंदे-फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे.

बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 224 पैकी 113 जागांची आवश्यकता असेल. या सर्वेक्षणानुसार काँग्रेस खूपच मजबूत स्थितीत दिसत आहे, असे म्हणता येईल. ते बहुमताच्या जवळ येऊ शकतात. पण काँग्रेस १५० जागांवर जावा करत आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 40% मते मिळतील, तर भाजपला 33.9% मते मिळतील. जेडीएसला 18.8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करू इच्छिता? दुहेरी इंजिन सरकार राज्यासाठी फायदेशीर ठरले आहे का, हेही जनतेतून जाणून घेण्यात आले. याच्या उत्तरात 38.7% लोकांनी होय असे उत्तर दिले, तर 40.6% लोकांनी नाही असे उत्तर दिले. 20.7% म्हणाले की ते काहीही सांगता येणार नाही असे म्हटले.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.