अमित शाह यांची गोंदियातली उद्याची सभा तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोंदियातली नियोजित उद्याची सभा रद्द करण्यात आली आहे. आता ही सभा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अमित शाह यांची गोंदियाची सभा आता गुढीपाडव्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांची गोंदियातली उद्याची सभा तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय?
अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 5:08 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या गोंदियात सभा आयोजित करण्यात आलीय. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोंदियात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं कोणत्या कारणास्तव ही सभा रद्द झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामागील कारणही समोर आलं आहे. अमित शाह यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने बैठका आणि दौरे सुरु असल्यामुळे कदाचित अमित शाह यांना थकवा जाणवत असू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह प्रकृतीच्या कारणास्तव गोंदियाच्या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची उद्याची गोंदिया येथील सभा रद्द करण्यात आली आहे. पुढील सभेचं नियोजन हे 12 किंवा 13 एप्रिलला राहणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

मोदींची चंद्रपुरात सभा

अमित शाह उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अमित शाह यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अमित शाह यांची उद्याची सभा रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. नरेंद्र मोदी येत्या 8 एप्रिलला चंद्रपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची चंद्रपुरात जाहीर सभा होणार आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी येत्या 8 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची मोरवा येथे सायंकाळी 4 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.