आसनसोल लोकसभा निवडणूक 2024: शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर; भाजपला करणार ‘खामोश’?

आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भोजपुरी गायक पवन सिंहच्या उमेदवारीवरून टीएमसीकडून जोरदार टीका झाली होती. सत्ताधारी पक्षाने आरोप केला होता की त्यांची अनेक गाणी महिलांबद्दल अपमानास्पद होती. त्यानंतर पवन सिंहने कोणतंही कारण न सांगता निवडणूक शर्यतीतून माघार घेतली.

आसनसोल लोकसभा निवडणूक 2024: शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर; भाजपला करणार खामोश?
Shatrughan Sinha
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2024 | 5:58 PM

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमधील आसनसोल (Asansol Constituency) मतदारसंघ बराच चर्चेत आहे. टीएमसीने पुन्हा एकदा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha AITC Candidate) यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार या मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत. तर भाजपने आधी भोजपुरी स्टार पवन सिंहला या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र पवन सिंहने नकार दिल्यानंतर भाजपने बर्दवान-दुर्गापूरचे खासदार एस. एस. आहलुवालिया (Surendrajeet Singh Ahluwalia BJP Candidate) यांना उमेदवारी दिली आहे. तर माकपच्या जहांआरा खान (Jahanara Khan CPM Candidate) निवडणुकीच्या रिंगणार आहेत. पवन सिंहवरून झालेल्या वादानंतर या मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. भाजप पुन्हा एकदा टीएमसीकडून हा मतदारसंघ हिसकावून घेऊ शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा विजयी

याआधी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आसनसोल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो विजयी झाले होते. मात्र मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यांनी भाजपशी संबंध तोडून खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर टीएमसीकडून त्यांनी बालीगंगे विधानसभा पोटनिवडणूक लढवली आणि तिथे ते जिंकून आले. सध्या ते ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. 2022 मध्ये लोकसभा पोटनिवडणूक झाली. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला होता.

2019 मध्ये रविशंकर प्रसाद यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव करून बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून ते बंगालमध्ये पोहोचले. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि त्यात त्यांनी विजय मिळवला. आसनसोल लोकसभा मतदारसंघ बराच काळ भाजपच्या ताब्यात होता. शत्रुघ्न सिन्हा यांच्या विजयाने टीएमसीला पहिल्यांदाच ही जागा काबीज करण्यात यश आलं होतं.

बाबुल सुप्रियो आसनसोलमधून दोनदा विजयी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार बाबुल सुप्रियो यांना 6 लाख 33 हजार 378 मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात तृणमूलच्या मुनमुन सेन उमेदवार होत्या. त्यांना 4 लाख 35 हजार 741 मतं मिळाली होती. त्यामुळे मुनमुनला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी टीएमसी उमेदवार डोला सेन यांचा पराभव केला होता.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर