West Bengal election 2021 : भाजपचे 40 स्टार प्रचार मैदानात, ममतांना नंदीग्राममध्ये घेरण्याचा प्लॅन ठरला!

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून (Nandigram) मैदानात उतरल्या आहेत.

West Bengal election 2021 : भाजपचे 40 स्टार प्रचार मैदानात, ममतांना नंदीग्राममध्ये घेरण्याचा प्लॅन ठरला!
Suvendu Adhikari vs Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 2:08 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal election 2021) मध्ये रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून (Nandigram) मैदानात उतरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात ममतांचे पूर्वीचे सहकारी आणि सध्या भाजपमध्ये असलेले सुवेंदु अधिकारी यांच्यात सामना होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालचं मैदान जिंकण्यासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. (Mamata Banerjee nomination from Nandigram BJP released 40 star campaigners list for West Bengal election)

भाजपने पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये 40 स्टार प्रचारकांची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नुकतंच भाजपमध्ये दाखल झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांसारख्या बड्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

TMC सोडून आलेल्यांना स्थान नाही

दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत, TMC सोडून आलेल्या नेत्यांना स्थान दिलं नसल्याचं दिसतंय. आधी TMC मध्ये असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांना सोडून, अन्य कोणाचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश नाही.

पंतप्रधान मोदींना विजयाचा विश्वास

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मोदींनी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीला संबोधित केलं. सर्वांनी आपआपल्या जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पार पाडा, असा सल्ला मोदींनी दिला. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, एस जयशंकर यांच्यासह दिग्गज उपस्थित होते.

40 स्टार प्रचारकांमध्ये कोण कोण?

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, कैलाश विजयवर्गीय, शिवप्रकाश, मुकुल रॉय, दिलीप घोष, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, फग्गन सिंह कुलस्ते, मनसुख भाई मंडाविया, जुवेल ओराम, राजीब बनर्जी, अरविंद मेनन, अमित मालवीय, बाबुल सुप्रियो, देबाश्री चौधरी, नरोत्तम मिश्रा, बाबूलाल मरांडी, रघुवर दास, लॉकेट चटर्जी, राजू बॅनर्जी, अमिताव चक्रवर्ती, ज्योतिर्मय सिंह महतो, सुभाष सरकार, कुनार हेमबरम, यशदास गुप्ता, श्रबंती चैटर्जी, हीरेन चैटर्जी आणि पायल सरकार यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यादृष्टीने भाजपचे बडे नेते रणनीती आखत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बंगालमध्ये तळ ठोकून आहेत.

ममता बॅनर्जींचा उमेदवारी अर्ज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी ममता बॅनर्जींनी रोड शो काढला. जवळपास 1 किमी चालत जाऊन ममता बॅनर्जींनी आपला अर्ज भरला. त्याआधी ममता बॅनर्जींनी शिवमंदिरात जाऊन पूजा केली.

नंदीग्राममध्ये सर्वात मोठी लढाई

नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे. शुंभेदू अधिकारी हे ममतांसोबत होते, त्यावेळी हा तृणमूलचाही बालेकिल्ला समजला जात असे. मात्र आता शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी थेट लढत होणार आहे. देशातील सर्वात मोठी अशी ही लढाई असेल.

शिवसेनेचाही ममतांना पाठिंबा

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी सांगितलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

संबंधित बातम्या  

ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट  

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.