AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 700 रुपये संपत्ती, ‘हे’ आहेत विधानसभा निवडणुकीतील 9 गरीब उमेदवार

सध्याच्या राजकारणात ज्याच्याकडे पैसा आहे, तो निवडणूक रिंगणात उतरतो. राजकीय पक्ष सुद्धा श्रीमंत उमेदवारांना प्राधान्य देतात. पण ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत चित्र थोडं वेगळ आहे.

फक्त 700 रुपये संपत्ती, 'हे' आहेत विधानसभा निवडणुकीतील 9 गरीब उमेदवार
election
| Updated on: Mar 02, 2023 | 10:12 AM
Share

North East Election Restult Live : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वांचच लक्ष या तीन राज्यांच्या निवडणूक निकालांकडे आहे. सध्याच्या राजकारणात ज्याच्याकडे पैसा आहे, तो निवडणूक रिंगणात उतरतो. राजकीय पक्ष सुद्धा श्रीमंत उमेदवारांना प्राधान्य देतात. पण ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत चित्र थोडं वेगळ आहे. इथे गरीब कुटुंबातून येणारे 9 उमेदवार निवडणूक लढवतायत. या 9 जणांपैकी कोण जिंकणार? ते अजूनही सांगता येणार नाही.

त्रिपुरा विधानसभेतील सर्वात गरीब उमेदवार

हीरामुनी देबबर्मा हे सर्वात गरीब उमेदवार आहेत. ते अपक्ष त्रिपुरा विधानसभेची निवडणूक लढवतायत. हीरामुनी पश्चिम त्रिपुरा मंडई बाजार (एसटी) सीटमधून निवडणुकीला उभ्या आहेत. त्यांनी आपली संपत्ती 700 रुपये दाखवली आहे. नागेंद्र चंद्र शील हे दुसरे सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती फक्त 1200 रुपये आहे. खेवाई जिल्ह्यातील कल्याणपुर-प्रमोद नगर सीटमधून ते आपलं नशीब आजमवतायत. मृदुल कांति सरकार अपक्ष निवडणूक लढवतायत. त्यांच्याकडे फक्त 2000 रुपयाची संपत्ती आहे. पश्चिम त्रिपुरा बदरघाट (एससी) सीटमधून ते नशीब आजमवतायत.

मेघालयमधील सर्वात गरीब उमेदवार

काँग्रेसचे अरबियंगकम खरसोहत हे मेघालयमधील सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांची संपती 9000 रुपये आहे. अमलारेम सीटवरुन ते निवडणूक रिंगणात आहेत. 22 हजार रुपये संपत्ती असलेले थोसेनगचीबा ए संगमा रक्समग्रे सीटमधून निवडणूक लढवतायत. भाजपाचे मार्क रिनाल्डी हे तिसरे गरीब उमेदवार आहेत. जो मॅरंगमधून निवडणूक लढवतायत. नागालँडमधील गरीब उमेदवार

गामपाई कोन्याक हे काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवत आहेत. नागालँड विधानसभेची निवडणूक लढवणारे ते सर्वात गरीब उमेदवार आहेत. फोमिंग विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांच्याकडे 5,251 रुपयांची संपत्ती आहे. एनपीएफचे चिंगसाक कोन्याक हे दुसरे गरीब उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 25 हजार रुपये संपत्ती आहे. डॉक्टर चिंगो वालिम अपक्ष निवडणूक लढवतायत. त्यांची संपत्ती 50 हजार रुपये आहे. तोहोक (अजजा) सीटवरुन ते निवडणूक रिंगणात आहेत.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.