मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून कळतंय सरकारवर विश्वास नाही, उत्तर प्रदेशबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

उत्तर प्रदेशमध्ये (up elections) आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे(supirya sule) यांनी केली आहे.

मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून कळतंय सरकारवर विश्वास नाही, उत्तर प्रदेशबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पाच राज्यात सध्या निवडणुकांचे (elections 2022) बिगूल वाजल्याने सर्वांच्या नजरा या पाच राज्यावर लागल्या आहेत, अशावेळी उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देशात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये (up elections) आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे(supirya sule) यांनी केली आहे. नेताजी, अखिलेश यादव, जयंत चौधरी यांचे आभार मानते. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी ज्याप्रकारे लढत आहेत, हे खूप समाधानकारक आहे. नक्की बदल होईल. ज्याप्रकारे केंद्र सरकार निर्णय घेत आहे, एलआयसी असो, जीएसटी कलेक्शन असो हे गंभीर आहे. विरोधकांना देखील यांनी विचारात घ्यायला हवं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

चंद्रकांत पाटलांना सुप्रिया सुळेंचं उत्तर

आमचं सरकार लोकशाहीला धरून आहे. त्यामुळे प्रत्येकाला मनमोकळेपणे बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा इथं अधिकार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी असं बोलणं हे योग्य नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच ओबीसीच्या इंपेरिकल डेटासाठी पंतप्रधान यांना मुख्यमंत्री यांनी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. परंतु तरीदेखील त्यांच्याकडून कोर्टात एक आणि संसदेत एक अशी ओबीसी इंपेरिकल डेटाबाबत माहिती दिली जाते, त्यामुळे कुठं तरी भाजप मधील ओबीसींमध्ये खदखद आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

स्वबळावर लढण्यात गैर काय?

गोव्यात काँग्रेसने स्वबळाचे संकेत दिल्यानंतर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस गोव्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असेल तर त्यामध्ये गैर काय आहे? असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच 12 निलंबित आमदारांबाबत महाविकास आघाडी नक्कीच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणेकरांनो सावधान ; शहरातील 5 दिवसातील कोरोना आकडेवारी काय सांगतेय: पाच सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र

Aurangabad: कन्नड तालुक्यात गूढ आवाज, दारं-खिडक्या हादरली, तहसीलदार म्हणतात…

IND vs SA: मोहम्मद शमीसाठी विराट कोहली मैदानावर अंपायरबरोबर भिडला

Published On - 4:54 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI