Aurangabad: कन्नड तालुक्यात गूढ आवाज, दारं-खिडक्या हादरली, तहसीलदार म्हणतात…

तालुक्यात कोठेही भूकंप मापक यंत्र नाही, तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना टाकळी येथेही हे यंत्र नाही. हा भूकंप नसल्याचे स्पष्टीकरण तहसीलदारांनी दिले आहे.

Aurangabad: कन्नड तालुक्यात गूढ आवाज, दारं-खिडक्या हादरली, तहसीलदार म्हणतात...
कन्नड तालुक्यात गूढ आवाज
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 4:47 PM

औरंगाबादः सोमवारी पैठण येथील जायकवाडी धरण परिसरातून गूढ आवाज आल्याने औरंगाबादेत खळबळ माजली होती. त्यानंतर आता मंगळवारी असा प्रकार कन्नड तालुक्यात घडलाय. कन्नड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गूढ आवाज झाल्याने अनेक घरांची दारं-खिडक्या हादरले. त्यामुळे भूकंप होतोय की काय, अशी भीती नागरिकांना वाटली. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा सौम्य भूकंपाचा धक्का आहे, अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र हे आवाज कसले आहेत, याबाबत ठोस माहिती पुढे आलेली नाही.

दारं,खिडक्या, भांडीही हादरली

कन्नडमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गूढ आवाज आल्यानं अनेक घरांची दारं-खिडक्या हादरली. भांडीही जागची हलली. शासकीय कार्यालयांमध्येही हे हादरे जाणवले. अर्थात यामुळे कोणतीही वित्तहानी झाली नाही. पण अचानक असा आवाज येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

तहसीलदार काय म्हणाले?

याबाबत तहसीलदार संजय वारकड म्हणाले, हा भूकंपाचा प्रकार नसून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तालुका प्रशासनदेखील याबाबत सतर्क आहे. तालुक्यात कोठेही भूकंप मापक यंत्र नाही, तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना टाकळी येथेही हे यंत्र नाही. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे सिस्मोग्राफ यंत्र बसवलेले आहे. कन्नड तालुक्यातील गूढ आवाजाबाबत तेथील तज्ज्ञांशी बातचित केली असता, या यंत्रावर भूकंप झाल्याची नोंद नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच या काही भूगर्भीय हालचाली असू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

इतर बातम्या-

Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

Nitesh Rane | भाजपा आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.