Tamil Nadu Assembly Election Result 2021: अभिनेता कमल हसन यांचा पराभव, भाजपच्या वनाथी श्रीनिवासन विजयी

अभिनेता कमल हसन यांचा कोईंबतुर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांचा पराभव केला.

Tamil Nadu Assembly Election Result 2021: अभिनेता कमल हसन यांचा पराभव, भाजपच्या वनाथी श्रीनिवासन विजयी
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 11:37 PM

चेन्नई : अभिनेता कमल हसन यांचा कोईंबतुर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांचा पराभव केला. वनाथी यांनी पहिल्या क्रमांकाची मतं मिळवत विजय मिळवलाय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोईंबतुर दक्षिण मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. कारण येथून ‘मक्कल नीधि मय्यम’चे संस्थापक आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हसन निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासून कमल हसन आघाडीवर होते, मात्र अखेरिस भाजपच्या वनाथी यांनी त्यांना मागे टाकत विजय मिळवला (MNM Chief and Actor Kamal Haasan lose Tamil Nadu Assembly election 2021 from Coimbatore).

कमल हसनने 2018 मध्ये मक्कल नीधि मय्यम हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणुकही लढली. मात्र, त्यांना एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. असं असलं तरी लोकसभेत काही मतदारसंघांमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची मतं मिळवली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत ‘मक्कल नीधि मय्यम’ पक्षाला एकूण 15 लाख 75 हजार मतं मिळाली होती.

कमल हसन यांचा राजकीय प्रवास

कमल हसन सुरुवातीपासून ते राजकारणासाठी नसल्याचं म्हणत आलेत. मात्र, नंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. 21 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी मदुरैमध्ये आपल्या पक्षाची घोषणा केली. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते त्यांच्यासोबत होते. कमल हसन यांच्या मक्कल नीधि मय्यम पक्षाने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकही लढली. मात्र, त्यांना एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र, जनतेने त्यांना भरभरुन मतं दिली.

कमल हसन यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास

कमल हसन यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी तब्बल 220 चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेता म्हणून उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना या योगदानासाठी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय.

कमल हसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमाक्कुडी येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नईत गेलं. कमल हसन यांनी पहिल्यांदा 1960 मध्ये चित्रपट कालाथुर कानम्मामध्ये अभिनय केला. या पहिल्याच चित्रपटात त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांना सर्वात मोठी संधी दिग्दर्शक बालचंदर यांनी अरंगेतरम आणि सोल्लाथान सारख्या चित्रपटांमध्ये दिली. यानंतर कमल हसन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही.

हेही वाचा :

Tamil Nadu Assembly Result : तामिळनाडूत डीएमकेची मुसंडी, कमल हसन आघाडीवर, पण त्यांच्या पक्षाचं काय झालं?

Tamilnadu Election 2021 : कमल हसन यांनी भाजप-काँग्रेसविरोधात दंड थोपटले, या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

कमल हासनच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अब्दुल कलामांच्या सल्लागाराला तिकीट

व्हिडीओ पाहा :

MNM Chief and Actor Kamal Haasan lose Tamil Nadu Assembly election 2021 from Coimbatore

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.