Tamil Nadu Assembly Result : तामिळनाडूत डीएमकेची मुसंडी, कमल हसन आघाडीवर, पण त्यांच्या पक्षाचं काय झालं?

प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांचा तामिळनाडू विधानसभेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

Tamil Nadu Assembly Result : तामिळनाडूत डीएमकेची मुसंडी, कमल हसन आघाडीवर, पण त्यांच्या पक्षाचं काय झालं?
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 5:18 PM

चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांचा तामिळनाडू विधानसभेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कोईंबतुर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच कमल हसन यांनी आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत काहीशी आघाडी कायम ठेवलीय. हाच ट्रेंड राहिला तर कलम हसन मक्कल नीधि मय्यम पक्षाचे पहिल आमदार ठरणार आहेत. एकिकडे कमल हसन विजयाकडे घोडदौड करत असले तरी तामिळनाडूच्या राजकारणात पर्याय देऊन पाहणाऱ्या त्यांच्या पक्षाचे बहुतांश उमेदवार पिछाडीवर दिसत आहेत (Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan leading from Coimbatore in Tamil Nadu Assembly Election)

कोईंबतुर मतदारसंघात सुरुवातीपासून कमल हसन यांचाच दबदबा

कोईंबतुर मतदारसंघातील मतमोजणीच्या 14 व्या फेरीतही कमल हसन आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 27589 मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवारापेक्षा त्यांना 1189 मतं अधिक आहेत. भाजपच्या वनथी श्रीनिवासन भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे तामिळनाडू कार्याध्यक्ष मयुरा जयकुमार आहेत. त्या डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडीकडून लढत आहेत. त्यांना आतापर्यंत 22 हजार 536 मतं मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नवघ्या मक्कल नीधि मय्यम पक्षाच्या कमल हसन यांचाच दबदबा असल्याचं दिसत आहे.

अभिनेते कमल हसन मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (2 मे) चेन्नईहून कोईंबतुर येथे आले. यावेळी त्यांनी येथील मतमोजणीची व्यवस्थेचीही पाहणी केली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून कमल हसन आघाडीवर आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस उमदेवारांमध्ये चुरस सुरु आहे.

हेही वाचा :

Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित?

Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील आक्षेपार्ह टीका ए. राजांना भोवली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Tamilnadu Election 2021: सत्ता आल्यास तामिळनाडूत सीएए आणि कृषी कायदे लागू करणार नाही; स्टॅलिन यांचं आश्वासन

व्हिडीओ पाहा :

Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan leading from Coimbatore in Tamil Nadu Assembly Election

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.