Tripura Election 2023 Result : टिपरा मोथा त्रिपुरात भाजपाच सत्तेच गणित बिघडवणार?

Tripura Election 2023 Result : सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या भाजपाच्या स्वप्नांना टिपरा मोथा पक्ष सुरुंग लावू शकतो. हा टिपरा मोथा कुठला पक्ष आहे? कोण संस्थापक आहे? तो एक्स फॅक्टर कसा? जाणून घ्या.

Tripura Election 2023 Result : टिपरा मोथा त्रिपुरात भाजपाच सत्तेच गणित बिघडवणार?
bjp
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:16 AM

Tripura Election 2023 Result LIVE : ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. नागालँडमध्ये भाजपा एनडीपीपीच्या साथीने सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपाचा खेळ बिघडण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा भाजपाने 39-40 जागांवर आघाडी घेतली होती. भाजपा दुसऱ्यांदा त्रिपुरामध्ये सहज सरकार स्थापन करेल, असं वाटत होतं. पण आता जे कल दिसतायत, त्यानुसार भाजपाची आघाडी घटत चालली असून डावे-काँग्रेस कमबॅक करताना दिसतायत. त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी, डावे-काँग्रेस आघाडी आणि माणिक्य देबबर्मा यांच्या टिपरा मोथा या तीन पक्षांमध्ये त्रिकोणी लढत आहे.

टिपरा मोथा गणित बिघडवणार?

सध्याच्या स्थितीत भाजपाकडे 29, डावे-काँग्रेस 19 आणि टीएमपी 13 जागांवर आघाडीवर आहे. डावे-काँग्रेस आणि टिपरा मोथा पक्ष एकत्र आले, तर भाजपाच सत्तेच गणित बिघडू शकतं. त्रिपुराच्या राजघराण्याचे राजे प्रद्योत माणिक्य देबबर्मा टिपरा मोथा पक्षाच नेतृत्व करतायत. हा पक्ष या निवडणुकीत एक्स फॅक्टर आहे. ते 13 जागांवर आघाडीवर आहेत. 2018 मध्ये भाजपाने त्रिपुरात किती जागा जिंकल्या?

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्रिपुरामध्ये सर्वाधिक 36 जागा जिकंल्या होत्या. डाव्यांची 35 वर्षांची सत्ता उलटवली होती. आयपीएफटीच्या साथीने भाजपा आघाडीकडे 44 जागा होत्या. डाव्या पक्षांना भाजपापेक्षा फक्त 1 टक्का कमी मत मिळाली होती. फक्त 16 जागा त्यांनी जिंकल्या होत्या.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.