गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या उमेवारांना या पक्षाने डावललं; सुशिक्षित उमेदवारांना संधी

जिंकून येण्याच्या तयारीचा असणा-या उमेदवारांना संधी

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या उमेवारांना या पक्षाने डावललं; सुशिक्षित उमेदवारांना संधी
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेश – निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू असल्याचे आपण पाहतोय, पण राष्ट्रीय लोक दलाने (rashtriy lok dal)मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना डावलून सुशिक्षित उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातून संधी दिली आहे. तसेच त्यांचे मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने (samajwadi party) सुध्दा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर करताना पक्षाने उमेदवार जिंकून येण्याच्या तयारीचा असणा-या उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पार्टीने गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील 29 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. जिथे 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामध्ये सपाचे 10 जागांवर तर आरएलडीने 19 जागांवर उमेदवार आहेत.

2017 च्या युपीच्या विधानसभा निवडणुकीत मुझफ्फरनगर, शामली, अलीगढ, आग्रा, गाझियाबाद, मेरठ, हापूर, गाझियाबाद या जिल्ह्यांतील बहुतेक जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. परंतु कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आणि बदलत्या जातीय समीकरणांचा मोठा फटका भाजपला बसला आहे. तिकीट वाटप करत असताना उमेदवाराची पार्श्वभूमी विचारात घेण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक दलाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी कोणीही गुंड नाही. निवड केलेले सगळे सुशिक्षित आणि पात्र उमेदवार आहेत. सगळे स्थानिक उमेदवार असल्याने त्यांचा त्यांच्या जनतेमध्ये थेट संबंध आहे.

शेतकरी आणि मुस्लिम समाज भाजपवर नाराज

संदीप चौधरी म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी अलिकडच्या काही महिन्यात प्रचारासाठी पंचायतींचे आयोजन केलं होतं. त्यावेळी लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भाजप सरकारने काही निर्णय घेतले. तसेच कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा उत्तर प्रदेश, विशेषत: पश्चिम भागात भाजपच्या संभाव्यतेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि मुस्लिम समाजही अनेक निर्णयांमुळे भाजपवरती नाराज आहे. भाजपने आत्तापर्यंत दिलेली खोटी आश्वासने जनतेला कळली आहेत.

समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल या युतीने उमेदवार जाहीर केलेल्या 29 जागांपैकी गेल्या निवडणुकीत सपाच्या नाहिद हसन कैरानामधून आणि रफिक अन्सारी मेरठमधून विजयी झाल्या होत्या, युतीने यावेळीही या दोघांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय लोक दलाचे फक्त सहेंद्रसिंग रमला हे एकमेव उमेदवार होते जे गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. तसेच रमाला बागपत या जिल्ह्यातील छपरौली मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या जागेसाठी आरएलडीने अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. विशेष म्हणजे आत्तापर्यंत जाहीर झालेल्या यादीत फक्त एका महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे.

भाजपच्या या बंडखोर आमदारांचा समाजवादी पार्टीत प्रवेश

भाजपचे 9 बंडखोर आमदार आज समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता

UP Assembly Election: काँग्रेसने राजकीय मैदानात उतरवली बिकनी गर्ल, बॉलिवूडमध्ये केलंय काम

 

 


Published On - 4:39 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI