Election Result 2022 Live: उत्तराखंडमध्येही भाजपचा बोलबाला; स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

Uttarakhand Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्वच्या सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. त्यानुसार 70 जागांपैकी 45 जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलीय. त्यामुळे उत्तर प्रदेशानंतर येथेही भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.

Election Result 2022 Live: उत्तराखंडमध्येही भाजपचा बोलबाला; स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
हरीश रावत, पुष्करसिंह धामी
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 5:35 PM

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) आज दुपारपर्यंत येणार आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पूर्ण बहुमताकडे (Absolute majority) वाटचाल सुरू आहे. सध्या सर्व जागांचे कौल हाती आले असून, या ठिकाणी एकूण 45 जागी भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंडमधील 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. 70 जागांसाठी सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 632 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चुरशीची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने देखील सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर असून, येथे त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतचे चित्र काय?

उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्वच्या सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. त्यानुसार 70 जागांपैकी 45 जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलीय. त्यामुळे उत्तर प्रदेशानंतर येथेही भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खात्यात 21 जागा जाताना दिसत आहेत. पंजाबमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या वाट्याला एकही जागा नाही, तर इतरांच्या खात्यात चार जागा जात आहेत.

विजयाची पुनरावृत्ती करणार?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला होता. हरिद्वारमध्ये हरीश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले होते. या निवडणुकीत भाजप विजयाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये मंत्री पिछाडीवर

अतिशय चुरशेच्या ठरलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपारपर्यंत हाती येतील. मात्र, सध्या तरी पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपचे सरकार येईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसचे पंधरा मंत्री पिछाडीवर आहेत. त्यांच्या डोक्यावर पराभवाची टांगती तलवार कायम आहे. हे चित्रही थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

टीव्ही 9 मराठीवर सुपरफास्ट निकाल :

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात अचूक आणि सर्वात जलद निकाल तुम्ही दिवसभर टीव्ही 9 मराठी आणि वेबसाईटवरही पाहू शकता. त्यासाठी https://www.tv9marathi.com/ या लिंकवर क्लिक करा.

इतर बातम्या :

‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं’, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.