AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला लोकांनी फ्लॉप चित्रपट, फ्लॉप चित्रपट म्हणून चर्चा करून ठरलं प्रचंड सुपरहिट. याच चित्रपटाने स्पाइडर-मॅन आणि द ओडिसीला टक्कर.

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 18, 2026 | 8:44 PM
Share

चीनमधील कमी बजेटचा अॅनिमेटेड चित्रपट ‘निउ लाई’ रिलीजच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. मात्र, चित्रपटातील खराब दर्जाच्या अॅनिमेशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि याच चर्चेमुळे चित्रपटाचे नशीबच बदलले.

‘Niu Lai’ या चिनी नावाचा अर्थ ‘द काऊ इज कमिंग’ अर्थात ‘गाय आ ​​रही है’ असा होतो. 86 मिनिटांचा हा चित्रपट चीनमध्ये 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या 10 दिवसांत या चित्रपटाने सुमारे 1.04 लाख रुपये कमावले होते. रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला चीनमध्ये 300 पेक्षाही कमी लोकांनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली होती.

मात्र, सोशल मीडियावर चित्रपटाच्या अॅनिमेशनची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. चित्रपटातील खराब कॉम्प्युटर ग्राफिक्स, पात्रांची विचित्र हालचाल, अजब व्हॉइस अॅक्टिंग आणि गोंधळलेली कथा यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याच्या अॅनिमेशनची तुलना विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टशी केली, तर काहींनी ते AI पेक्षाही खराब असल्याचे म्हटले. अनेकांनी ‘निउ लाई’ला 2026 मधील सर्वात खराब चित्रपटांपैकी एक असेही संबोधले.

फ्लॉप-फ्लॉप म्हणून चित्रपट ठरला सुपरहिट

पण या टीकेचाच चित्रपटाला अनपेक्षित फायदा झाला. सोशल मीडियावरील चर्चेमुळे ‘निउ लाई’ची उत्सुकता वाढली आणि लोक हा चित्रपट स्वतः पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ लागले. परिणामी, चित्रपटाच्या कमाईत अचानक मोठी वाढ झाली.

चीनी तिकीट विक्री प्लॅटफॉर्म माओयानच्या माहितीनुसार, ‘निउ लाई’ने आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे चीनच्या बॉक्स ऑफिसवर या छोट्या बजेटच्या चित्रपटाची तुलना आता क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ आणि ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’सारख्या मोठ्या चित्रपटांशी केली जात आहे.

चित्रपट पूर्ण होण्यासाठी लागली पाच वर्षे

या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणीही तितकीच अनोखी आहे. ‘निउ लाई’ हा चित्रपट शिन युमेंग आणि सन लिफांग या केवळ दोन व्यक्तींनी पाच वर्षांहून अधिक काळात तयार केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या दोघांनीच चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि व्हॉइस अॅक्टिंगची जबाबदारीही सांभाळली आहे.

‘निउ लाई’ची कथा एका नवजात बछड्याभोवती फिरते. या बछड्याचे एका स्कायलार्क पक्ष्यासोबतचे नाते आणि त्यांच्यातील भावनिक प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांच्या नात्याला एका दृश्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?