AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाच्या या गाण्याने लोकांना शिकवलेल्या चुकीच्या गोष्टी, तरीही गाणं ठरलेलं सुपरहिट

31 वर्षांपूर्वीचं गोविदाच्या या गाण्याने लोकांना शिकवल्या चुकीच्या गोष्टी. तरी देखील गाणं मुलांचं ठरलं आवडतं. गोविंदाच्या डान्स आणि अनु मलिकच्या संगीतामुळे आजही गाणं प्रचंड चर्चेत.

गोविंदाच्या या गाण्याने लोकांना शिकवलेल्या चुकीच्या गोष्टी, तरीही गाणं ठरलेलं सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 02, 2026 | 6:45 PM
Share

90 च्या दशकात अभिनेता गोविंदा हा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचा लाडका स्टार होता. त्याचा भन्नाट डान्स, जबरदस्त एनर्जी आणि गाण्यांमधील हटके अंदाजाची त्या काळातील तरुणाई अक्षरशः चाहती होती. गोविंदाच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम केले. यापैकीच एक म्हणजे ‘मेरी मर्जी’.

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॅम्बलर’ या चित्रपटातील हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. गोविंदाचा एनर्जेटिक डान्स आणि अनु मलिक यांचं कॅची संगीत यामुळे गाण्याला वेगळीच रंगत आली. विशेष म्हणजे देवांग पटेल यांच्या आवाजातील हटके रॅप सीनमुळे हे गाणं अधिक मजेदार बनवलं.

मजेशीर पण हटके होते गाण्याचे बोल

‘मेरी मर्जी’च्या बोलांमध्ये विनोद, अतिशयोक्ती आणि नियम झुगारण्याचा अंदाज पाहायला मिळतो. ‘मैं चाहे ये करूं, मैं चाहे वो करूं’ अशा ओळींमधून आपल्या मनाप्रमाणे काहीही करण्याचा मजेशीर अंदाज मांडण्यात आला होता. गाण्यातील काही ओळी जाणीवपूर्वक बेताल आणि नियम मोडण्याची भाषा करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या काळातील मुलांनाही हे गाणं विशेष आवडत असे.

गोविंदाच्या सिग्नेचर डान्स स्टेप्स आणि त्याची जबरदस्त एनर्जी यामुळे गाणं पडद्यावर अधिकच खुलून दिसलं. विनय दावे यांच्या शब्दांना देवांग पटेल यांच्या आवाजाची साथ आणि अनु मलिक यांच्या संगीताची जोड मिळाल्याने ‘मेरी मर्जी’ ९०च्या दशकातील लक्षात राहिलेल्या गाण्यांपैकी एक ठरलं.

चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

‘गॅम्बलर’ हा चित्रपट 8 डिसेंबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. दयाल निहलानी दिग्दर्शित या चित्रपटात गोविंदा याच्यासोबत शिल्पा शेट्टी आणि आदित्य पंचोली यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं बजेट सुमारे 5.50 कोटी रुपये होतं. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही; मात्र ‘मेरी मर्जी’ या गाण्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली.

90 च्या दशकातील मुलांच्या आठवणींमध्ये आजही हे गाणं कायम आहे. गोविंदाचा भन्नाट डान्स, देवांग पटेल यांची हटके गायकी, अनु मलिक यांचं कॅची संगीत आणि विनय दावे यांचे मजेशीर बोल यामुळे जवळपास तीन दशकांनंतरही ‘मेरी मर्जी’ची चर्चा होताना दिसते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा