AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटात हेमा मालिनी प्रत्यक्षात होत्या गरोदर, पडद्यावर बनलेल्या जितेंद्र यांच्या पत्नी

45 वर्षांपूर्वी या चित्रपटात हेमा मालिनी प्रत्यक्षात होत्या गरोदर, पण अनेकांच्या लक्षातच आलं नाही. पडद्यावर बनलेल्या जितेंद्र यांच्या पत्नी. कोणता आहे तो चित्रपट?

45 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटात हेमा मालिनी प्रत्यक्षात होत्या गरोदर, पडद्यावर बनलेल्या जितेंद्र यांच्या पत्नी
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 24, 2026 | 5:29 PM
Share

बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीला पडद्यावर गर्भवती दाखवायचे असेल तर मेकअप, विशेष वेशभूषा आणि कृत्रिम ‘बेबी बंप’चा वापर केला जातो. अनेकदा अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात गर्भवती असतानाही चित्रीकरणादरम्यान ती बेबी बंप लपवते. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची कल्पना येत नाही. मात्र, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग घडला. त्यांनी एका चित्रपटाचे चित्रीकरण स्वतः गर्भवती असतानाच केले आणि विशेष म्हणजे त्या चित्रपटातही त्यांनी गर्भवती पत्नीचीच भूमिका साकारली होती.

हा रंजक किस्सा आहे 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरी आवाज सुनो’ या चित्रपटातील. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हेमा मालिनी या त्यांच्या पहिल्या कन्या ईशा देओल यांच्या जन्माची प्रतीक्षा करत होत्या. त्याच काळात चित्रपटातही त्यांना गर्भवती पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामुळे पडद्यावर दिसणारा त्यांचा बेबी बंप हा मेकअप किंवा कृत्रिम साधनांद्वारे तयार केला नव्हता, तर तो त्यांच्या प्रत्यक्ष गर्भावस्थेचा भाग होता. त्यामुळे चित्रपटातील अनेक प्रसंग अत्यंत नैसर्गिक आणि वास्तववादी वाटले. आजही हा चित्रपट पाहताना त्या भूमिकेतील सहजता आणि वास्तवतेची प्रचिती येते.

त्या काळात प्रेग्नन्सी लपवण्याचीच पद्धत

1980 च्या दशकात अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याबाबत विशेषतः गर्भावस्थेबाबत सार्वजनिकपणे बोलण्याची प्रथा फारशी नव्हती. अनेक अभिनेत्री आपली प्रेग्नन्सी गोपनीय ठेवत आणि दिग्दर्शकही चित्रीकरण असे करत की, प्रेक्षकांना त्याची कोणतीही कल्पना येऊ नये.

मात्र, ‘मेरी आवाज सुनो’ या चित्रपटाने या बाबतीत वेगळा अपवाद निर्माण केला. कारण कथानकानुसारही हेमा मालिनी यांना गर्भवती पत्नीची भूमिका साकारायची होती. त्यामुळे त्यांच्या वास्तविक गर्भावस्थेचाच चित्रपटात प्रभावी वापर करण्यात आला. चित्रपटातील गाणीही त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरली आणि त्यामध्येही हेमा मालिनी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

जितेंद्रसोबतची सुपरहिट जोडी

‘मेरी आवाज सुनो’ हा त्या काळातील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात अभिनेते जितेंद्र दुहेरी भूमिकेत झळकले होते. एका भूमिकेत ते प्रामाणिक पोलीस अधिकारी होते, तर दुसऱ्या भूमिकेत गुन्हेगारी विश्वाशी संबंधित व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली होती.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या गर्भवती पत्नीची भूमिका प्रभावीपणे साकारली. चित्रपटात परवीन बाबी, रंजीत, कादर खान आणि शक्ती कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...