AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’सारखीच जबरदस्त क्रेझ, 51 वर्षे जुना चित्रपट; थिएटमध्ये 60 महिन्यांपर्यंत शोज

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये जी क्रेझ पहायला मिळतेय, तशीच जबरदस्त क्रेझ 51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटासाठी होती. हा चित्रपट कोणता आणि ही इतकी क्रेझ का होती, ते जाणून घ्या..

'धुरंधर 2'सारखीच जबरदस्त क्रेझ, 51 वर्षे जुना चित्रपट; थिएटमध्ये 60 महिन्यांपर्यंत शोज
51 वर्षीय जुना चित्रपटImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 25, 2026 | 11:44 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर 19 मार्च रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि थिएटर्समध्ये गर्दीच गर्दी होऊ लागली. ‘धुरंधर 2’ प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आणि या सहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. परंतु असा हा पहिलाच चित्रपट नाही, ज्याची प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ पहायला मिळत असेल. याआधीही अशाच प्रकारचं वेड बॉलिवूड चित्रपटांसाठी पहायला मिळालं होतं. त्यापैकीच एक चित्रपट 51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे चाहते आजही आहेत आणि ‘मस्ट वॉच’ चित्रपटांमध्ये आजही त्याचं नाव घेतलं जातं. 51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा कल्ट क्लासिक बॉलिवूड चित्रपट तब्बल पाच वर्षांपर्यंत थिएटरमध्ये चालला होता.

‘धुरंधर 2’सारखीच क्रेझ

दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर 2’कडे हिंदी चित्रपटाची परिभाषा बदलणारा चित्रपट म्हणून पाहिलं जात आहे. अशाच प्रकारचा एक चित्रपट पाच दशकांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीच्या नशिबालाच बदलून टाकलं होतं. ज्या चित्रपटाचं इतकं कौतुक केलं जात आहे, त्याचं नाव आहे ‘शोले’. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाने बॉलिवूडच्या यशाचा एक इतिहासच रचला होता. सध्या ‘धुरंधर 2’बद्दल प्रेक्षकांमध्ये जी क्रेझ पहायला मिळतेय, अशीच क्रेझ त्यावेळी ‘शोले’साठी होती. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये याचं नाव आवर्जून घेतलं जातं.

पाच वर्षे थिएटरमध्ये शोज

‘शोले’च्या यशाचा आणि क्रेझचा अंदाज आयएमडीबीच्या रिपोर्टवरून सहज लावला जाऊ शकतो. मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये तब्बल पाच वर्षांपर्यंत हा चित्रपट चालला होता, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या. धर्मेंद्र, अमजद खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

बजेटच्या पाचपट कमाई

‘शोले’ या चित्रपटाचा बजेट 3 कोटी रुपये होतं, असं म्हटलं जातं. तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बजेटच्या पाच पट म्हणजेच 15 कोटी रुपये कमावले होते. ‘धुरंधर 2’मधील हमजा अली मजारी, जमील जमाली, मेजर इक्बाल, एसपी अस्लम यांच्या भूमिकांबद्दल सोशल मीडियावर जशी चर्चा होत आहे, तशाच प्रकारे शोलेमधील भूमिका त्यावेळी लोकप्रिय ठरल्या होत्या. शोलेमधील डाकू गब्बर सिंह, जय-वीरूची जोडी, ठाकूर साहब, बसंती या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत.

Follow Us
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.