72nd National Film Awards 2026 Winners list : सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री ते बेस्ट डायरेक्टर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? वाचा Full List
72nd National Film Awards 2026 Full Winners list : 72 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘आर्टिकल 370’ ने मारली बाजी. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री ते बेस्ट डायरेक्टर कोणा-कोणाला मिळाला पुरस्कार. वाचा संपूर्ण यादी

72nd National Film Awards 2026 Full Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमधील केवडिया येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर, गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कार्तिक आर्यन आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मम्मूट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अभिनेत्री यामी गौतम हिने ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मम्मूट्टी यांना ‘ब्रमायुगम’साठी राष्ट्रीय पुरस्कार
मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता मम्मूट्टी यांनी ‘ब्रमायुगम’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट डार्क फँटसी आणि लोक-हॉरर या प्रकारातील आहे.
‘ब्रमायुगम’चे दिग्दर्शन राहुल सदाशिवन यांनी केले आहे. मम्मूट्टी यांच्यासोबत अर्जुन अशोकन आणि सिद्धार्थ भरथन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील मम्मूट्टी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.
या पुरस्कारासह मम्मूट्टी यांच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. आतापर्यंत त्यांना एकूण चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.
72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी (72nd National Film Awards 2026 Full Winners list)
दादासाहेब फाळके पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कार: अनंत नाग
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: आर्टिकल ३७०
सर्वोत्कृष्ट अभिनेता: कार्तिक आर्यन – चंदू चॅम्पियन आणि ममूटी – ब्रमायुगम
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम – आर्टिकल ३७०
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी – अमरन
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: संजय मिश्रा – भक्षक
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: रोपाश्री वरकाडी – मिथ्या आणि सचाना नमिदास – महाराजा
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: रणदीप हुड्डा – स्वातंत्र्य वीर सावरकर
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक फीचर फिल्म: कल्कि २८९८ एडी
राष्ट्रीय, सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: चिन्ना कथा काडू
सर्वोत्कृष्ट बालकलाकार: रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब, गीताश्री चक्रवर्ती, अरुंदेव पोथुला आणि अथीश एस. शेट्टी
लेखन पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पटकथा: सुकुमार – पुष्पा २ आणि योगेश देशपांडे – स्वर्गंधर्व सुधीर फडके
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: वेंकी अटलुरी – लकी भास्कर
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: शेहनाद जलाल – ब्रमायुगम
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: नितीन झिहानी चौधरी – कल्कि २८९८ एडी
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन: अनल अरासू – महाराजा
सर्वोत्कृष्ट संकलन: आर. कलैवानन – अमरन
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना: मानस चौधरी – भूल भुलैया ३
सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइन: दीपाली नूर आणि शीतल शर्मा – पुष्पा २
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: पी. रवी कुमार – कमिटी कुरोल्लू
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली – स्त्री २
संगीत पुरस्कार
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी): शाश्वत सचदेव – आर्टिकल ३७०
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत): जी. व्ही. प्रकाश कुमार – अमरन
सर्वोत्कृष्ट गीतकार: मनोज मुंतशिर – मैदान
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक: अभय जोधपूरकर – ‘नवसाची गौरी माझी’ (घरात गणपती)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: वैकॉम विजयलक्ष्मी – ‘अंगु वाना कोनिलु’ (एआरएम)
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट
आसामी: जुईफूल
बंगाली: चलचित्र एखोन
गढवाली: ढोली
गुजराती: मारण
हिंदी: श्रीकांत
कन्नड: मिथ्या
कोंकणी: मोग आसुम
मल्याळम: फेमिनिची फातिमा
मणिपुरी: सुनीता
मराठी: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
ओडिया: लाहरी
तमिळ: रायन
तेलुगू: कमिटी कुरोल्लू
तुळू: इम्बू
यंदा सर्वोत्कृष्ट पंजाबी, ताई फाके आणि गारो चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आलेला नाही.
विशेष उल्लेख – फीचर फिल्म
धनुष: कॅप्टन मिलर
सुरेन जी: मेयाझगन
नॉन-फीचर फिल्म पुरस्कार
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: भंगार (ऑब्सोलीट)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: रवी राज मुर्मू – अंगेन् (इनव्हिजिबल)
सर्वोत्कृष्ट माहितीपट: राम-नामी – भरतबाला गणपती
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: पिपलांत्री : अ टेल ऑफ इको फेमिनिझम – सूरज कुमार
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म: टच्ड अॅज वॉटर – जोशी बेनेडिक्ट
सर्वोत्कृष्ट लघुपट (३० मिनिटांपर्यंत): हमसफर – अभिजीत अरविंद दळवी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: आनंद एल. राय – स्टॅच्यू ऑफ युनिटी : एकता का प्रतीक
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: एडमंड रॅन्सन – लाइफ इन लूम
सर्वोत्कृष्ट संकलन: मनवीर जसरोतिया – एनडीए
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना: टी. एस. हरि हरा सुधन – ब्लू
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: शिवपाल सिंह कांग – परत ४१°च्या मागावर
सर्वोत्कृष्ट निवेदक/व्हॉइस ओव्हर: सौंदर्या जयचंद्रन – लिटल प्लॅनेट : अ टेल ऑफ फ्रॉग्स
सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट: मेन निदा
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक पुनर्निर्मिती/संकलन चित्रपट: काकोरी
विशेष उल्लेख – नॉन-फीचर फिल्म
भद्र-काली नाटकम (भद्रा : द डान्स ऑफ काली): आनंद ज्योती
चोला डोरा और सुई: जयमिन मोदी आणि लोकेश घई
चित्रपटावरील लेखन
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: संजीव श्रीवास्तव (हिंदी)
