AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90च्या दशकातील हे गाणं ऐकताच मनाला मिळतो सुकून, 31 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

90च्या दशकातील हे गाणं ऐकताच मनाला भेटतो सुकून. 31 वर्षांपासून अनेक तरुणांचं आवडतं गाणं. अभिजीत भट्टाचार्य आणि अलका याग्निक यांच्या आवाजामुळे आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट.

90च्या दशकातील हे गाणं ऐकताच मनाला मिळतो सुकून, 31 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
| Updated on: Oct 04, 2026 | 2:59 PM
Share

90च्या दशकातील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख केला जातो. या जोडीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याच काळातील त्यांचं ‘आंखों में बसे हो तुम’ हे रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या आठवणीत आहे.

नुकतंच या सदाबहार गाण्याला 31 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतकार आणि गायक अनु मलिक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सोशल मीडियावर गाण्याचा व्हिडीओ शेअर करत या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांनी आपल्या सहज आकर्षणाने आणि अदांनी या गाण्यात जीव ओतला असं त्यांनी म्हटलं.

‘आंखों में बसे हो तुम’ आजही लोकप्रिय

‘आंखों में बसे हो तुम, तुझे दिल में छुपा लूंगा’ हे गाणं 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टक्कर’ या रोमँटिक थ्रिलर चित्रपटातील आहे. अभिजीत भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी हे गाणं गायलं असून अनु मलिक यांनी त्याला संगीत दिलं आहे. गाण्याची मधुर चाल आणि प्रेमभावना व्यक्त करणारे शब्द यामुळे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं.

14 जुलै 1995 रोजी ‘टक्कर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भरत रंगाचारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, शफी इनामदार, मोहन जोशी, राकेश बेदी आणि कादर खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

अनु मलिक यांच्या संगीताचा खास ठसा

अनु मलिक हे चार दशकांहून अधिक काळ भारतीय संगीतविश्वाचा भाग आहेत. ‘बाजीगर’, ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘बॉर्डर’, ‘जुड़वा’, ‘सोल्जर’, ‘रिफ्यूजी’, ‘जोश’, ‘फिझा’, ‘मर्डर’, ‘नो एंट्री’, ‘मैं हूं ना’ आणि ‘इश्क विश्क’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत.

संगीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर अनु मलिक यांनी काही लोकप्रिय गाणी स्वतःही गायली आहेत. ‘गोरी गोरी’, ‘एक गरम चाय की प्याली हो’, ‘ऊंची है बिल्डिंग’ आणि ‘आयला रे लड़की मस्त मस्त’ यांसारखी त्यांची गाणीही गाजली. तसेच त्यांनी ‘इंडियन आयडल’ या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शोच्या अनेक सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी