वर्षा उसगांवकर यांच्याकडून झाली ‘ही’ मोठी चूक, त्या एका चुकीमुळेच आता…
बिग बॉस मराठी 5 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना एक खास टास्क देण्यात आलाय. दुसरीकडे वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाहीये. वर्षा उसगांवकर या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत.

बिग बॉस मराठीचे 5 वे सीजन तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका करण्यास सुरूवात केलीये. आता बिग बॉसच्या घरात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. दोन बेबी या घरात दाखल झाले आहेत. हा टास्क बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना देण्यात आलाय. या टास्कमध्ये बाळाची काळजी घरातील सदस्यांना घ्यायची आहे. हेच नाही तर बाळाला फक्त आणि फक्त मराठीमध्येच बोलायचे आहे. या टास्कसाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरामध्ये दोन ग्रुपही तयार केले आहेत. आता बिग बॉसच्या घरात चांगलाच हंगामा होताना दिसतोय.
बिग बॉसच्या निर्मात्यांकडून काही नियम तयार करण्यात आले. बाळाला फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचे आहे. जी टीम जास्त इंग्रजीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये बोलेल, अशी टीम हारेल. यासोबतच बाळाची काळजी देखील व्यवस्थित घ्यायची आहे. आता या टास्कवेळीच वर्षा उसगांवकर यांच्याकडून मोठी चूक झालीये.
या टास्कसाठी घरात दोन ग्रुप पडल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉसचे घर दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. यावेळी वर्षा उसगांवकर या बाळाला क्यूट असल्याचे म्हणताना दिसतात. हे अरबाजच्या लक्षात येते. यावेळी वर्षा ताईंनी बाळ खूप क्यूट असल्याचे सांगताना अरबाज हा दिसला. यानंतर घरात ठेवण्यात आलेल्या बोर्डवर ही गोष्ट लिहिण्यात आली.
आता वर्षा उसगांवकर यांच्या या चूकीची शिक्षा त्यांच्या संपूर्ण टीमला भोगावी लागणार आहे. हेच नाही तर या टास्कवेळी वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यामध्येही झटापट झाल्याचे बघायला मिळतंय. वर्षा उसगांवकर या निकी तांबोळीचा हात ओढताना स्पष्टपणे दिसत आहेत. पॅडीला बाळाचे कपडे बदलण्यापासून रोखताना निकी तांबोळी ही दिसत होती.
आता या बेबीच्या टास्कमध्ये नेमकी कोणती टीम जिंकणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, हे सीजन प्रेक्षकांना चांगलेच आवडताना दिसत आहे. अनेक दिग्ग्ज कलाकार बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात अजून धमाका होईल, असेही दिसत आहे.
