श्वेता नंदा हिचे लेकरं करिश्मा कपूरला म्हणतात आत्या, मोठा खुलासा, अभिषेक बच्चन यांच्यासोबतच्या….
गेल्या काही दिवसांपासून सतत बच्चन कुटुंबिय तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर बच्चन कुटुंबात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये.

बच्चन कुटुंबियांमध्ये मोठा वाद सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सुरू आहेत. हेच नाही तर दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. यावर भाष्य करणे बच्चन कुटुंबियांनी टाळले आहे. अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत नाही तर मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. तेंव्हापासूनच घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या ही सलमान खान याला डेट करताना दिसली. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न झाले.
ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर अभिषेक बच्चन याचे लग्न करिश्मा कपूर हिच्यासोबत ठरले होते. मात्र, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अभिषेक बच्चन हा बहीण श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा आणि मुलगी नव्या नवेली नंदा यांच्यावर खूप प्रेम करतो. अभिषेक, अगस्त्य आणि नव्या यांचे खास फोटो देखील व्हायरल होताना दिसतात.
एकेकाळी अगस्त्य हा करिश्मा कपूर हिला मामी म्हणत होता. मात्र, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे नाते तुटल्यानंतर तो आताही करिश्मा कपूर हिला आत्या म्हणतो. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे. नात्याने अगस्त्य नंदा आणि नव्या यांची आत्या करिश्मा कपूर ही लागते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिचे लग्न करिश्मा कपूरची मावशी रितू कपूर नंदा यांचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे.
यामुळेच करिश्माला अगस्त्य आणि नव्या आत्या म्हणतात. असे म्हटले जाते की, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची पहिली भेट देखील श्वेता बच्चन हिच्या लग्नामध्येच झाली होती. करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे नाते अचानक तुटले. असे सांगितले जाते की, जया बच्चन यांचे म्हणणे होते की, लग्नानंतर करिश्मा कपूर हिने चित्रपटांमध्ये काम करू नये.
हीच गोष्टी करिश्मा कपूरच्या आईला मान्य नव्हती. त्यानंतर यांचे नाते तुटले आणि करिश्मा कपूरचे लग्न हे दिल्लीचे प्रसिद्ध व्यावसायिक संजय कपूर याच्यासोबत करण्यात आले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच तिने पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. काही वर्षांपूर्वीच करिश्मा कपूर हिने पतीसोबत घटस्फोट घेतला. करिश्मा कपूर हिला एक मुलगा आणि एक मुलगी असून ती एकटीच मुलांचा सांभाळ करते.
