Aai Kuthe Kay Karte | सणाच्या दिवशीही आईच्या वाट्याला दुःखच!  देशमुखांच्या पारंपरिक पूजेत अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | सणाच्या दिवशीही आईच्या वाट्याला दुःखच!  देशमुखांच्या पारंपरिक पूजेत अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी!
आई कुठे काय करते

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते. अरुंधतीच्या तर उत्साहाला पारावर नसतो. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं, तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे (Aai Kuthe Kay Karte Holi 2021 special episode sanjana will participate in holi).

देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना पुन्हा एकदा या आनंदात विरजण घालायला संजनाची एंट्री झाली नाही, तरच नवलच! होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखील सहभागी करावं, अशी अनिरुद्धची इच्छा असते.

अनिरुद्धच्या वागण्याने पुन्हा दुखावली जाणार ‘अरुंधती’

अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती पुन्हा एकदा दुखावली जाणार आहे. देशमुखांच्या होळीच्या या पारंपारिक पूजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का?, यात सहभागी होऊन ती आणखी काय करणार?, हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होळीच्या निमित्ताने या मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आई’ म्हणून अरुंधतीवर पडलीय मोठी जबाबदारी

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्यातील गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे यश-गौरीचं नव्यानं खुलणारं नातं, तर अनघा आणि अभिषेकच्या नात्याची नव्याने होणारी सुरुवात, तर दुसरीकडे इशाचं अनोळखी मुलामध्ये गुंतणं या सगळ्याकडे अरुंधती लक्ष ठेवून आहे. आई म्हणून अरुंधतीने आतापर्यंत आपल्या सर्व जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडल्या आहेत. मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात अरुंधतीनं कोणतीही कसर राहू दिली नाही (Aai Kuthe Kay Karte Holi 2021 special episode sanjana will participate in holi).

जोडीदाराच्या निवडीत अरुंधती देणार मुलांना साथ!

मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये देखील अरुंधती त्यांना मोलाची साथ देणार आहे. यश-गौरीचं नातं अनिरुद्धला पटलेलं नसलं, तरी अरुंधतीने मात्र ठाम भूमिका घेत या दोघांच्या नात्याला होकार दिला आहे. अभिषेक आणि अंकितामध्ये बिनसल्यानंतर, सुस्वभावी अनघा अरुंधतीला अभिषेकची परफेक्ट लाईफ पार्टनर वाटली. अभिषेकलाही अनघा आवडू लागली आहे. मात्र इथेही अनिरुद्धची नकार घंटा आहेच. त्यामुळे अभिषेकचं मन जपत अरुंधतीला यातून मार्ग काढायचा आहे. इशाच्या आयुष्यातही सध्या बरेच चढउतार सुरु आहेत. ज्या मुलाच्या प्रेमात इशा पडली आहे त्याची पार्श्वभूमी फारशी बरी नाही. अर्थात इशाला याची जाणीव नसली तरी अरुंधतीने हे अचूक हेरलं आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या आयुष्यातल्या या नव्या वळणाला सामोरं जाण्यासाठी अरुंधतीने कंबर कसली आहे.

(Aai Kuthe Kay Karte Holi 2021 special episode sanjana will participate in holi)

हेही वाचा :

Video | नेहा कक्करच्या घरी होळी पार्टी, रोहनप्रीतसह पूल डान्स सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ…

Dia Mirza | लग्नानंतर दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले ‘बिकिनी’ फोटो!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI