Aai Kuthe Kay Karte | अप्पांना हृदयविकाराचा झटका, आतातरी अनिरुद्धला नात्यांची किंमत कळेल का?

प्पा अर्थात अनिरुद्धच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे ऑपरेशन करावे लागणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | अप्पांना हृदयविकाराचा झटका, आतातरी अनिरुद्धला नात्यांची किंमत कळेल का?

मुंबई : ‘आई कुठे काय करते?’ (Aai Kuthe kay karte) ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. कुटुंबाला विश्व मानणाऱ्या आईला अर्थात अरुंधतीला आता सत्य परिस्थिती कळली आहे. अनिरुद्धचे संजनासोबत असणारे नाते उघड झाल्यानंतर आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अप्पा अर्थात अनिरुद्धच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे ऑपरेशन करावे लागणार आहे. (Aai Kuthe kay karte latest update Appa falls ill)

एकीकडे अनिरुद्ध मुद्दाम अरुंधतीला त्रास देतोय. तर, दुसरीकडे तो संजना दूर जाऊ नये म्हणून खटाटोप करत आहे. ठेच लागल्याने शहाणी झालेली अरुंधतीने आता स्वतःच्या इच्छेने जगण्यास सुरुवात केली आहे. गेल्या भागात अरुंधती अप्पांच्या सल्ल्याने मैदानात फिरण्यासाठी जाते. अप्पांना अस्वस्थ वाटत असल्याने ते अरुंधतीसोबत जाण्यास नकार देतात. अरुंधती एकटीच मैदानात फिरून येते. घरात आल्या आल्या अप्पा आजारी असल्यासारखे वाटतात. मात्र, ते मला काहीच होत नाहीय, असे म्हणून अरुंधतीच्या शंका फेटाळून लावतात. तितक्यात अनिरुद्ध कामाला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर येतो.(Aai Kuthe kay karte latest update Appa falls ill)

संजनाचे नाव घेऊन अरुंधतीला त्रास देण्याचा प्रयत्न

अनिरुद्धला चहा न दिल्याने त्याच्या आईची अरुंधतीवर चिडचिड सुरू असते. या सगळ्या गोष्टींना नजर अंदाज करून अरुंधतीला त्रास देण्यासाठी अनिरुद्ध मुद्दाम त्याला पिकअप करण्यासाठी संजना येणार असल्याचे सांगतो. त्यावेळी अप्पा त्याला संध्याकाळी घरी लवकर ये, संपत्ती संदर्भात महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगतात. मात्र, महत्त्वाची बैठक असल्याने आज जमणार नाही, असे म्हणत अनिरुद्ध त्यांना टाळतो आणि निघून जातो. (Aai Kuthe kay karte latest update Appa falls ill)

इशाला कंटाळा आल्याने ती आईकडे बाहेर फिरून येऊ म्हणून हट्ट करते. तिला हो म्हणत, गौरीलाही बरोबर नेऊ, तिला बोलव, असे अरुंधती सांगते. त्या तिघी जनी बाहेर जाण्यासाठी निघतात तेव्हा त्यांची भेट संजनाशी होते. संजना गौरीशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र, गौरी तिला मला तुझ्याशी काहीच संबंध ठेवायचे नाहीत, असे म्हणून तिथून निघून जाते. अरुंधतीही संजनाला काही समजुतीचे शब्द ऐकवून तिथून निघून जाते.(Aai Kuthe kay karte latest update Appa falls ill)

बाहेरून परत येताच अप्पांची बिघडलेली तब्येत अरुंधतीच्या लक्षात येते. तितक्यात अप्पा जोरात ओरडतात आणि खाली कोसळतात. घरातले सगळे डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर तपासून, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देतात. घरात कोणीच पुरुष व्यक्ती नसल्याने अप्पांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अडथळे निर्माण होतात. इशा अनिरुद्धला सतत फोन करते. परंतु तो फोन उचलत नाही. इतक्यात यश घरी आल्याने, तो अप्पांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेतो. तिथे डॉक्टर अप्पांची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगतात. ऑपरेशनच्या फॉर्मवर अरुंधती( (Aai Kuthe kay karte) सही करते आणि थेट संजनाच्या घरी पोहचते. तिथे अनिरुद्ध संजनाच्या बेडरूम झोपलेला दिसतो. अरुंधतीला पाहताच तो चिडतो आणि तिला बडबडायला सुरुवात करतो. मात्र, तुमचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, हे अरुंधतीने सांगितल्यावर अनिरुद्धला धक्का बसतो. आता तरी अनिरुद्धला नात्यांची किंमत कळेल का? तो सत्य सांगेल का? आणि अरुंधतीचे पुढचे पाऊल काय असेल?, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

(Aai Kuthe kay karte latest update Appa falls ill)

Published On - 6:13 pm, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI