AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा ‘आर्या’ लूक सोशल मीडियावर शेअर केल्याने आता तीच ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रश्मीने या मालिकेचे शूटिंग सुरु केले असून, तिच्यावर चित्रित झालेले भाग आजपासून (31 मार्च) प्रदर्शित होणार आहेत.

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक
रश्मी अनपट
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 31, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ (Aai Majhi Kalubai) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुख्य नायिका तब्बल तिसऱ्यांदा बदलली जात आहे. प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad), वीणा जगतापनंतर (Veena Jagtap) आता ‘आर्या’ ही भूमिका अभिनेत्री रश्मी अनपट (Actress Rashmi Anpat) सकारणार आहे. रश्मीने तिचा या मालिकेतील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधीच अनेक वादांमुळे चर्चेत असलेली ही मालिका आता वीणाच्या एक्झिटमुळे चर्चेत आली आहे. वीणाने या मालिकेला राम-राम म्हटल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look).

अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा ‘आर्या’ लूक सोशल मीडियावर शेअर केल्याने आता तीच ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रश्मीने या मालिकेचे शूटिंग सुरु केले असून, तिच्यावर चित्रित झालेले भाग आजपासून (31 मार्च) प्रदर्शित होणार आहेत.

पाहा रश्मीचा ‘आर्या’ लूक

View this post on Instagram

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

रश्मी या पोस्टमध्ये लिहीते की, ‘आर्याच्या भूमिकेत,तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असुदे’. आता आर्याच्या रुपात रश्मीला प्रेक्षक किती पसंत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look).

मालिकेतून प्राजक्ताला दाखवलेला बाहेरचा रस्ता

मालिकेच्या सुरुवातीला ‘आर्या’ हे पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘हे’ पात्र साकारले होते. त्यानंतर या मालिकेतून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर या मालिकेतून स्वत:च बाहेर पडल्याचं प्राजक्ता म्हटली होती. त्यानंतर या सगळ्यात खूप मोठा वाद उभा राहिला होता. सोशल मीडियावरही हा वाद चर्चेत आला होता. त्यानंतर अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसली आणि तिने प्राजक्ताला रिप्लेस केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा बदल होत आहे. मालिकेत पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र 2’ या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रश्मी अनपट आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

… म्हणून वीणाने सोडली मालिका!

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा सतत आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे या मालिकेमुळे शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याचे त्यांचे चाहते म्हणत आहेत. आता वीणाच्या जागी रश्मी अनपट ही भूमिका साकारणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट झालीय, हे समोर येतेय. एका भूमिकेसाठी सतत अभिनेत्री बदलणे ही गोष्ट खटकत असली, तरी आता रश्मी या भूमिकेतून प्रेक्षकांना किती पसंत पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look)

हेही वाचा :

उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!

Ramayan 3D | ‘सीता’ बनलेल्या दीपिकाचा नायक बदलणार? हृतिक रोशनऐवजी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता!

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...