AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंहावर आरुढ ‘आई तुळजाभवानीचा’ जागर; मालिकेत मांजरा नदीची अन् सिंह वाहनाची गोष्ट

'आई तुळजाभवानी' ही मालिका सध्या घराघरात आवर्जून पाहिली जाते. आई तुळजाभवानीची ही भक्तरक्षणाची गाथा परिस्थितीशी, वाईट शक्तींशी लढण्याचं बळ देणारी आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

सिंहावर आरुढ 'आई तुळजाभवानीचा' जागर; मालिकेत मांजरा नदीची अन् सिंह वाहनाची गोष्ट
'आई तुळजाभवानी' मालिकेचं कथानक रंजक वळणावर Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2024 | 8:01 AM
Share

राज्यातल्या प्रत्येक घराघरात भक्तिभावाने बघितल्या जाणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आतापर्यंत भक्त रक्षणासाठी आईने केलेले अनेक चमत्कार बघायला मिळाले. मालिकेत प्रेक्षकांना आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास अनुभवायला मिळाला. ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेचा मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग पार पडला, ज्यात देवीचा उत्तरेकडून पश्चिमेकडे प्रवास झाला. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’चं आगमन झालं. म्हाळसा देवीने आई तुळजाभवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. तसेच तुळजा आणि म्हाळसा यांनी मिळून दुर्जनानांचा संहार केला.

‘आई तुळजाभवानी’ आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट देखील मालिकेत दाखविण्यात आली. या भेटीत मार्गशीष गुरुवार व्रताचीकथा देखील सांगितली. तर दुसरीकडे कद्दरासुराची आदिशक्तीच्या शक्तींना वश करण्याची दुष्ट योजना देवी तुळजाभवानीने त्रिदेवांच्या साथीने धुळीस मिळवली. आता याच मार्गशीर्ष गुरुवारच्या विशेष भागांच्या शृंखलेत सगळ्या भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय म्हणजे सिंह या तुळजाभवानीच्या वाहनाची अनोखी गोष्ट पहायला मिळणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी सिंहावर आरूढ आई तुळजाभवानीचा जागर पहायला मिळणार आहे.

कद्दरासुराने बांध घालून कैद केलेल्या नदीच्या सुटकेची रोमांचक गोष्ट या आठवड्यात मालिकेत बघायला मिळणार आहे. तुळजाभवानी देवीने सोनेरी मांजरीचं रूप घेऊन नदीची केलेली सुटका हा कथाभाग असलेली मांजरा नदीची ही प्रसिद्ध गोष्ट प्रेक्षकांना पाहता येईल. आई तुळजाभवानीच्या कृपेने नदीची सुटका होते आणि यामुळेच चिडलेला कद्दरासुर निर्भय झालेल्या लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी पुढची योजना आखतो आणि गावात भुकलेला बिबट्या सोडतो. या बिबट्याने कसा धुमाकूळ घातला आणि तुळजाभवानी देवीनं तिचं वाहन सिंहामार्फत तिचा निस्सीम भक्त आबाची केलेली थरारक सुटका मार्गशीर्ष गुरुवारी पाहता येणार आहे. देवीच्या असुरवध कार्याशी आणि शौर्यगुणाशी संबंधित असलेला शौर्याचं, निर्भयतेचं प्रतीक असलेला सिंह, देवीच्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो, याचा दिव्य प्रत्यय या गोष्टीतून मिळतो. येत्या गुरुवारी 20 आणि शुक्रवारी 21 डिसेंबरला हा ‘मार्गशीर्ष गुरुवारी होणार सिंहावर आरूढ आई तुळजाभवांनीचा जागर’ कथाभाग पाहता येईल. ‘आई तुळजाभवानी’चा जागर या मालिकेतून दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा