AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan 3rd Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर

Aamir Khan 3rd Marriage: गेल्या काही दिवसांपासून आमिर खान गर्लफ्रेंड गौरीसोबत अनेक ठिकाणी फिरताना दिसत होता. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aamir Khan 3rd Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर
Amir Khan And GauriImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 03, 2026 | 5:10 PM
Share

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी विवाह करणार आहे. येत्या ५ जुलैला अभिनेता आमिर खान घरीच एका खाजगी समारंभात आपल्या नात्याला अधिकृत नाव देणार आहे. त्यांच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त केवळ अत्यंत जवळचे लोकच सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आमिरने २०२५ मध्ये त्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गौरीसोबतच्या आपल्या नात्याची पुष्टी केली होती. त्याने मीडियासमोर गौरीची ओळख करून दिली होती. आमिरने असेही सांगितले होते की, तो गौरीला गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो, परंतु त्यांच्या नात्याची सुरुवात २०२३ मध्ये झाली. ते दोघे अनेकदा एकमेकांसोबत फिरताना दिसतात. टीव्ही९ (TV9) ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता हे दोघे ५ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हे गौरीचे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नापासून गौरीला एक मुलगा देखील आहे, ज्याचे वय सुमारे ७ वर्षे आहे.

रीना दत्तासोबत झाले होते आमिरचे पहिले लग्न

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले होते. मात्र, २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केले होते. २०२१ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. किरणसोबतच्या घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आमिर आणि गौरी रिलेशनशिपमध्ये आहेत.

गौरी मूळची बंगळुरूची राहणारी आहे. तिचा चित्रपटांशी काहीही संबंध नाही. तिचा सलूनचा व्यवसाय आहे, ज्याची सुरुवात तिच्या आईने केली होती. याशिवाय, ती आमिर खानच्या प्रॉडक्शन कंपनीशीही जोडलेली आहे. गौरीने यापूर्वी एका बुटीकमध्ये कन्सल्टिंग डिझायनर म्हणूनही काम केले आहे.

आमिर खानला किती मुले आहेत?

आमिर खानबद्दल बोलायचे तर, पहिल्या लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव जुनैद खान आहे आणि मुलीचे नाव आयरा खान आहे. तसेच, किरण रावपासून त्याला एक मुलगा आहे, ज्याचे नाव आझाद आहे. काही काळापूर्वी जुनैदचा ‘एक दिन’ नावाचा एक चित्रपट आला होता. आमिरनेच त्या चित्रपटाची निर्मिती केली होती.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा