AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं रे! थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार, आमीर खानच्या माहितीने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट; स्टोरी काय असणार?

थ्री इडियट्स-2 या चित्रपटासाठी सध्या स्क्रीप्ट रायटिंगचे काम चालू आहे. चित्रपटाची कथा पूर्ण झालेली आहे. स्क्रीप्टवर आणखी काम करणे गरजेचे आहे, असे आमीर खानने सांगितले आहे.

ठरलं रे! थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार, आमीर खानच्या माहितीने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट; स्टोरी काय असणार?
three idiots 2Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 28, 2026 | 4:13 PM
Share

Three Idiots 2 : प्रसिद्ध अभिनेत्रा आमीर खान याचा थ्री इडियट्स हा चित्रपट आजही तेवढ्याच उत्सुकतेने पाहिला जातो. या चित्रपटात हाताळलेला विषय आणि त्यातून करण्यात आलेले भाष्य यामुळे तो देश तसेच जगभरात चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटाचा पुढचा भागही यायला हवा होता, अशी इच्छा अनेकांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे. आमीर खानचे चाहते तर थ्री इडियट्स-2 हा चित्रपट यायलाच हवा, असा आवर्जुन आग्रह करत असतात. दरम्यान, आता खुद्द आमीर खाननेच त्याच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. आता थ्री इडियट्स या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. म्हणजेच थ्री इडियट्स-2 हा चित्रपट लवकरच येणार आहे. त्यावर सध्या काम चालू आहे, असे आमीर खानने सांगितले आहे.

रँचो, राजू, फरहान पुन्हा एकत्र दिसणार

थ्री इडियट्स-2 या चित्रपटासाठी सध्या स्क्रीप्ट रायटिंगचे काम चालू आहे. चित्रपटाची कथा पूर्ण झालेली आहे. स्क्रीप्टवर आणखी काम करणे गरजेचे आहे, असे आमीर खानने सांगितले आहे. विशेष म्हणजे थ्री इडियट्स-2 या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी हेच करणार आहेत. लवकरच आता आपल्याला पुन्हा एकदा रँचो, राजू आणि फरहान या तीन जिवलग मित्रांची धम्माल पाहायला मिळणार आहे. आमीर खानने सांगितल्यानुसार या चित्रपटाची कहाणीदेखील थ्री इडियट्स या पहिल्या भागाप्रमाणाच खिळवून ठेवणारी आहे.

चित्रपटाची कहाणी काय असणार आहे?

थ्री इडियट्स-2 या चित्रपटाची कहाणी नेमकी काय असेल, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु थ्री इडियट्स हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला तेथून पुढे 10 वर्षांनी काय काय घडलं, हे सगळं या चित्रपटात सांगण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये आमीर खान (रँचो, फुंगसुक वांगडू), आर. माधवन (फरहान), शरमन जोशी (राजू रस्तोगी) हे तिघेही एकत्र दिसतील. सोबतच या चित्रपटात करिना कपूरही असेल. विधू विनोद चोडपा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2009 साली थ्री इडियट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा थ्री इडियट्स-2 हा चित्रपट लवकरच येणार आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!