Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानचा लहान भाऊ जगतोय असं आयुष्य, बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश, घेतला मोठा निर्णय

Faisal khan: फार कमी लोकांमा माहिती आहे आमिर खानच्या लहान भावाबद्दल, अनेक सिनेमांमध्ये केलंय एकत्र काम, आज आमिर जगतोय रॉयल आयुष्य पण 'तो' मात्र..., सध्या सर्वत्र आमिर खानचा भाई फैजल खान याची चर्चा...

आमिर खानचा लहान भाऊ जगतोय असं आयुष्य, बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश, घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 9:41 AM

अभिनेता आमिर खान बॉलिवूड विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार आहे. पण अभिनेत्याचा भाऊ फैजल खान याला कदाचीत कोणी ओळखत असेल. फैजल खान याने 1969 मध्ये बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. सिनेमाचं नाव ‘प्यार का मौसम’ असं होतं. सिनेमात फैजल याने अभिनेते शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. ‘प्यार का मैसम’ सिनेमानंतर फैजल अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘मेला’ सिनेमात झळकला. पण आता अभिनेता अत्यंत साधं आयुष्य जगत आहे.

फैजल खान इंडस्ट्रीमध्ये त्याच्या भावाप्रमाणे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवू शकला नाही. पण त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ सिनेमात फैजल याने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला. तर आमिर मुख्य भूमिकेत होता. ‘मेला’ सिनेमात देखील फैजल याने उत्तम भूमिका साकारली. पण त्याला बॉलिवूडवर राज्य करता आलं नाही.

आमिर खानचा भाऊ फैजल देखील सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मेला सिनेमात दिसला होता. या सिनेमात भयंकर खलनायकापासून ते ॲक्शन, गाणी आणि नाटक असं सर्व काही होतं, परंतु रिलीजनंतर हा सिनेमा फ्लॉप ठरला. या सिनेमाच्या अपयशामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडचा निरोप घेतला.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, फैजल खान आज देखील ‘मेला’ सिनेमामुळे चाहत्यांच्या लक्षात आहे. सिनेमात त्याने शंकर या भूमिकेला न्याय दिला होता. पण भूमिकेचा फैजलच्या करियरला कोणताच फायदा झाला नाही. फैजल याच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तो निर्माते ताहिर हुसैन यांचा मुलगा आहे. अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. पण फैजल इंडस्ट्रीपासून दूर स्वतःचं खासगी आयुष्य जगत आहे.

फैजल खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, फक्त 6 – 7 सिनेमांमध्ये अभिनेत्याने काम केलं असेल. पण कोणताच सिनेमाच्या त्याच्या करियरसाठी महत्त्वाचा ठरला नाही. अखेर अभिनेत्याने बॉलिवूडचा निरोप घेतण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेता आमिर खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.  आमिर खानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.