
Kiran Rao : अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि फिल्ममेकर किरण राव हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. किरण राव हिच्यावर 12MM डायमीटर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली आहे. रविवारी स्वतः किरण हिने रुग्णालयातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये किरण हिने रुग्णालयाबाहेरील दृश्य दाखवले आहेत. एका फोटोमध्ये, तिच्या हातावर एक टॅग दिसत आहे, ज्यावर “किरण आमिर राव खान.” असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये, ती सेल्फी काढताना दिसते. शेवटच्या फोटोमध्ये, ती सोफ्यावर बसून जेवण खाताना दिसते.
किरण राव सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, ‘मी 2026 मध्ये पार्टी करण्यासाठी पूर्ण तयार आहे. तेव्हाच माझ्या अपेंडिक्सने मला सांगितलं की जरा हळू… दिर्घ श्वास घ्या आणि आभारी राहा… मी माझ्या मित्रांचा आणि कुटुंबाचा, आमिर, चार्ल्स आणि अमीनचा खूप आभारी आहे, जे माझ्या मदतीसाठी धावत आले. माझे इतर प्रियजन बहुतेकदा माझे सुजलेले ओठ पाहून हसत होते. ही एक ऍलर्जीक प्रतिक्रिया होती.’
किरण पुढे म्हणाली, ‘आता मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी घरी परतली आहे… नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देखील मी तयार आहे.. 2025 माझ्यासाठी चांगला राहिला… मी आशा करते की 2026 हे वर्ष देखील चांगलं वर्ष राहिल…’ एवढंच नाही तर, किरण हिने डॉक्टर आणि रुग्णालयातील टीमचे देखील आभार मानले.
किरणच्या पोस्टवर आयरा खान आणि अदिती राव हैदरी यांनी लाल हृदयाच्या इमोजीसह कमेंट केली. करण जोहर, झोया अख्तर आणि श्रुती सेठ यांनीही प्रतिक्रिया दिली आणि तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
किरण राव हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, किरण हिने 2005 मध्ये आमिर याच्यासोबत लग्न केलं. पण 2021 दोघे विभक्त झाले. पण दोघे मिळून मुलगा आझाद याचा सांभाळ करत आहेत. किरणने तिच्या कारकिर्दीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. 2024 मध्ये तिचा ‘लापता लेडीज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं.