AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लगान’ मधून चर्चेत आलेली गोरी मॅडम 22 वर्षांनंतर काय करते? पाहा तिचे अदाकारी फोटो

आमिर खानच्या लगान या चित्रपटातील गोरी मॅम ही व्यक्तिरेखाही खूप लोकप्रिय झाली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. गोरी मॅम 22 वर्षांनंतर कुठे आहे माहीत आहे का?

'लगान' मधून चर्चेत आलेली गोरी मॅडम 22 वर्षांनंतर काय करते? पाहा तिचे अदाकारी फोटो
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 01, 2023 | 11:21 PM
Share

मुंबई : आमिर खानचा लगान हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता या चित्रपटाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यामधीलच गोरी मैम ही व्यक्तिरेखा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. पण या चित्रपटानंतर गोरी मैम कुठे आहे माहिती आहे का? तर आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

2001 साली लगान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तोच हा चित्रपट ज्यामध्ये लगानच्या बदल्यात भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना रंगतो.  या चित्रपटात आमिर खानच्या विरुद्ध अभिनेत्री ग्रेसी सिंग दिसली होती. या दोघांसोबतच या चित्रपटात इतर अनेक कलाकारही मुख्य भूमिकेत दिसले होते.

लगान चित्रपटात गोरी मैम ही एक व्यक्तिरेखाही होती, जी ब्रिटिश होती. त्यावेळी गोरी मैमची भुवन म्हणजेच आमिरशी चांगली मैत्री होते. तसंच क्रिकेटच्या सामन्यावेळी तीही भुवनला साथ देत असते. त्यामुळे गोरी मैम या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण गोरी मैम ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नक्की कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि ती आता कुठे आहे. तर आता आपण याच अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत.

या अभिनेत्रीनं साकारलेली गोरी मैमची भूमिका

लगान चित्रपटात गोरी मैमची भूमिका करणारी अभिनेत्री खरोखरच ब्रिटिश आहे.  ही व्यक्तिरेखा  अभिनेत्री आणि मॉडेल रशेल शैले हिने साकारली होती. रशेल शैले ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लगान हा तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता. पण या चित्रपटानंतर रशेल इतर कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसली नाही.

आता कुठे आहे गोरी मैम?

मिळालेल्या माहितीनुसार, गोरी मैम म्हणजेच रशेल शैले ही तिच्या देशात सक्रिय आहे. ती अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबतच ती एक लेखकही आहे. विशेष सांगायचं झालं तर, लगानला प्रदर्शित होऊन  22 वर्षे झाली आहेत. तर दुसरीकडे रशेल ही आता 53 वर्षांची झाली आहे.

रशेल जरी 53 वर्षांची झाली असली तरी ती अजूनही तितकीच सुंदर दिसत आहे.  सोशल मीडियावर नेहमी तिचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. तिच्या या फोटोंवर चाहते नेहमीच लाइक्सचा वर्षाव करत असतात. त्याचबरोबर रशेलनं ‘द एल वर्ल्ड और द बोन स्नॅचर’ यासारख्या चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा