AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: घटस्फोटानंतर रीना दत्ता, किरण रावसोबत कसं नातं आहे?, आमिर म्हणतो “आमच्या मनात एकमेकांबद्दल..”

आमिर खान आणि करीना कपूर लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या शोमध्ये दिसणार आहेत. या एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या एपिसोडमध्ये करण जोहरने दोन्ही कलाकारांसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप चर्चा केली.

Aamir Khan: घटस्फोटानंतर रीना दत्ता, किरण रावसोबत कसं नातं आहे?, आमिर म्हणतो आमच्या मनात एकमेकांबद्दल..
Aamir Khan: घटस्फोटानंतर रीना दत्ता, किरण रावसोबत कसं नातं आहे?Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 10:30 AM
Share

आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरचा हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे, त्यामुळे आमिर त्याच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यादरम्यान आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलताना दिसत आहे. 2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव (Kiran Rao) यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. आमिरच्या या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकमेकांसोबत मैत्रीचं नातं जपताना दिसत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या आणि किरणच्या नात्याविषयी सांगितलं.

आमिर खान आणि करीना कपूर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या शोमध्ये दिसणार आहेत. या एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या एपिसोडमध्ये करण जोहरने दोन्ही कलाकारांसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप चर्चा केली. याचवेळी आमिरने त्याच्या आणि किरण रावच्या नात्याबद्दल सांगितलं. आमिर म्हणाला, “माझे दोघांशी (पहिली आणि दुसरी पत्नी) चांगले संबंध आहेत आणि मी दोघांचा आदर करतो. आम्ही नेहमीच कुटुंब राहू.”

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आमिर पुढे म्हणाला, “आमच्या मनात एकमेकांबद्दल काहीही चुकीचं नाही. आम्ही सगळे कितीही व्यस्त असलो तरी आठवड्यातून एकदा तरी भेटतो. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम आणि आदर करतो.” आमिर खानचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत झालं होतं. दोघांचा प्रेमविवाह झाला होता पण 2002 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि रीना विभक्त झाले. यानंतर आमिर खानने किरण रावशी 2005 मध्ये लग्न केलं. पण आमिरचं दुसरं लग्नही टिकू शकलं नाही. गेल्या वर्षी आमिर आणि किरणने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

‘कॉफी विथ करण’चा सातवा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केला जात आहे. आमिर खान आणि करीना कपूरचा भाग या गुरुवारी प्रसारित होईल. दोघंही त्यांच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.