Ira Khan-Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल, आयरा-नुपूरचा खास लूक
आमिर खानची लाडकी लेक आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला रजिस्टर मॅरेज केले. आता उदयपूरमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग होत असून 10 जानेवारीला आयरा आणि नुपूर मराठमोळ्या पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच आयराचा मेहंदी सोहळा पार पडला.

Ira Khan – Nupur Shikhare wedding : आमिर खानची लाडकी लेक आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला रजिस्टर मॅरेज केले. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. त्यांचे फोटो, व्हिडीओही सोशल मीजडियावर व्हायरल झाले. त्या शिवाय नुपूरची लग्नातील एंट्रीही बरीच चर्चेत होती. पण आता राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग होत असून 10 जानेवारीला आयरा आणि नुपूर मराठमोळ्या पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. आयरा आणि नुपूरचे सर्व कुटुंबीय आणि मित्रमंडळी उदयपूरला पोहोचले आहेत.
त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींनाही ( pre-wedding functions) सुरूवात झाली असून त्याचे एकेक फोटो सोशल मीडियावर येत आहेत. नुकताच आयराचा मेहंदी सोहळा पार पडला. तिच्या हातावर नुपूरच्या नावाची सुंदर मेहंदी काढण्यात आली. या सोहळ्यात नुपूरही सहभागी झाला होता. त्यांच्या या फंक्शनचा पहिला फोटोही समोर आला आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल
उदयपूर सध्या आणखी एका सेलिब्रिटी वेडिंगमुळे गजबजलं आहे. अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा- नुपूर शिखरेच्या लग्न सोहळ्याची आणि त्यातील अनेक फंक्शन्ससाठी उदयपूर सज्ज झालं आहे. उदयपूर एअरपोर्टवरच पाहुण्यांचे खास पद्धतीने स्वागत केले जात आहे. तलावांचे शहर अशी ओळख असलेले हे शहर अतिशय शानदार असून लग्नाचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर आयरा-नुपरच्या संगीतचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, आता त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे पहिले फोटोही समोर आले आहेत. त्या फोटोंमध्ये आयरा अतिशय सुंदर दिसत असून तिच्या हातावर नुपरच्या नावाची मेहंदी रचलेली दिसत आहे. रंगीत गॉगल लावून ती एक कूल ब्राईड दिसत आहे. व्हाईट कलरची बॅकलेस चोली आणि लेहंगा घातलेल्या आयराच्या मागे उभं राहून नुपूरनेही एक पोझ दिली. I.N अशी त्यांच्या दोघांच्या नावाची इनिशिअल्सही मेंहदीने हातावर काढलेली एका फोटोत दिसत आहेत. दोघेही अतिशय क्यूट दिसत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
मुंबईत ग्रँड रिसेप्शन
७ जानेवारीपासून लग्नाच्या फंक्शन्सना सुरूवात झाली. ८ जानेवारीला मेहंदी आणि पजामा पार्टी होती, तर आज म्हणजे ९ जानेवारी रोजी हळदीचा कार्यकर्म होईल. उद्या, १० जानेवारीला आयरा आणि नुपूर मराठमोळ्या पद्धतीने विवाह बंधनात अडकतील. उदयपूरमधील ग्रँड वेडिंगनंतर आमिर खान त्याच्या लाडक्या लेक आणि जावयासाठी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन देणार आहे. तेथे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी, सेलिब्रिटीही सहभागी होतील.
